पंचनामा विशेष – नाते कलेचे माझ्या रक्ताशी!!विशेष लेख – अष्टपैलू व्यक्तिमत्व अहमद साहब बेल्हेकर


मरावे परी,कीर्ती रुपी उरावे!!
हेच ते काही वर्षांपूर्वी,अखंड महाराष्ट्रात गाजलेले,तमाशा लोककलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेले,खरे कलेचे वारसदार,
तमाशा इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवलेले, तमाशा फड मालक आणि ताशा सम्राट अहमद साहब बेल्हेकर ता.जुन्नर जि.पुणे
समता, बंधुभाव यांचे एकत्रिकरण करून,गावामध्ये सलोखा ठेवणारे, हिंदू,मुस्लिम यांची एकी करून, गुण्यागोविंदाने गावामध्ये शांतता प्रस्थापित करणारे, सुखदुःखात धावणारे ,गोरगरिबांना सहकार्य करणारे, सर्व जाती धर्माची एकी करून,सत्याची बाजू मांडणारे, गावामध्ये एकजूट कशी राहील, याची नोंद घेणारे आणि आपल्या लोककलेतून जनजागृती करणारे, त्यांच्या चमके शिवबाची तलवार या पोवाड्याने तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजला होता.आणि ताशा वाजवण्यात तर त्यांचा हातखंडा होता, ताशा सम्राट म्हणून त्यांची ख्याती होती.अखंड महाराष्ट्रात रसिकांच्या ओठावर आपले नाव ठेवलेले हेच ते अहमद साहब बेलेकर होय!!
त्यानंतर ताशा वाजायची जागा कादरभाई यांनी घेतली ते गेल्यानंतर आता सध्या नशीर भाई हे चांगल्या प्रकारे ताशा वाद्यकामात तयार आहे.त्यांच्या घराण्यात पिढ्यान पिढ्या कला अवगत आहे. त्यामुळे बेल्हे गाव कलावंतांचे माहेरघर आहे असे समजले जाते. विशेष सांगायचे म्हणजे,शिर्डीचे श्री साईबाबा यांनी सुद्धा अहमद साब यांना आशीर्वाद दिले होते.तसेच श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आणि वारकरी संप्रदायाने त्यांचा केलेला सत्कार हे त्यांना मोठे अभिमानास्पद होते.
या महान कलावंतांचे वय 106 वर्ष होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला.
पुन्हा अशी माणसं कधी जन्माला येतील देव जाणे!!
त्यांची आठवण आली म्हणजे, हृदय दाटून येते खरंच चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचे नाव या तमाशा इतिहासातून पुसले जाणार नाही. हे अगदी खर आहे. त्यांच्या स्मृतीस शतशः कोटी कोटी प्रणाम…….
लेखक – शाहीर खंदारे
ता.नेवासा
86 05 55 84 32