क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीसामाजिक

भारतातील पहिली पारंपरिक धनुर्विद्या स्पर्धा चंदीगड मध्ये संपन्न!!


प्रतिनिधी – समीर गोरडे
चंदीगड येथे भारतातील पहिली पारंपारिक धनुर्विद्या स्पर्धा पार पडली. यामध्ये आदर्शगाव गावडेवाडी येथील प्रा.प्रतिक दत्तात्रय निघोट यांनी पुरुष गटात तिसरा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत एकूण 28 फेऱ्या खेळवल्या गेल्या. या फेऱ्यांमध्ये भूतानी टारगेट (140m) , कोरियन टारगेट(90m), तुर्कीश पुटा टारगेट (70m), लडाख डामनाक टारगेट (40m), 3D टारगेट (20m), कझाख झांबी टारगेट (30m), भारतीय आदिवासी टारगेट (30m) इत्यादी लक्ष्यांचा वेध घेतला गेला. इंडोवेदिक ट्रॅडिशनल आर्चरी असोसिएशन द्वारा आयोजित या स्पर्धेत देशभरातल्या विविध राज्यांमधून तसेच जर्मनी,स्लोवाकिया आणि नॉर्वे या देशांमधील 44 स्पर्धक सहभागी झाले होते.  प्रतिक यांनी अंतिम फेऱ्यांमध्ये 42, 70, 64 आणि 29 असे गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकवला. त्यांनी स्वतः बनविलेले धनुष्य आणि बाण वापरून ही कमाल केल्याने त्यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
भारताला पारंपरिक धनुर्विद्येचा हजारो वर्षांचा इतिहास असून देखील ही विद्या लोप पावलेली आहे. धनुर्विद्येच्या पुनरुज्जीवनासाठी प्रतिक हे गेली पाच वर्ष सतत प्रयत्न करत आहेत. ते वसिष्ठ धनुर्वेदाचा सखोल अभ्यास करून धनुष्यबाण बनविणे तसेच चालवण्याची कला आत्मसात करत आहे. धनुर्विद्या ही फक्त शस्त्रविद्या नसून मानसिक एकाग्रता व स्वयंशिस्त हे देखील त्याचे महत्वाचे पैलू आहेत. तसेच हंगेरी येथे होणाऱ्या ट्रॅडिशनल वर्ल्ड कप साठी प्रतीकची निवड झाल्याबद्दल त्याचे खूप कौतुक होत आहे. भारतीय ज्ञान परंपरा मिशन अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात धनुर्विद्येचा समावेश होणे आवश्यक आहे. या यशाबद्दल प्रतिकचे निघोट परिवार, महेश निघोट,व गावडेवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.