आरोग्य व शिक्षण

पारगाव(ता.आंबेगाव) येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै.बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परिक्षेला ४६८ विद्यार्थी!!

 

पारगाव (ता.आंबेगाव ) येथील संगमेश्वर माध्यमिक विद्यालयातील परिक्षा केंद्रात बारावी इंग्रजी भाषेचा लेखी परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली.

परिक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै.बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी
विषयाच्या लेखी परिक्षेला ४६८ विद्यार्थी बसले
पारगाव येथील विद्यालयातील इयत्ता बारावी परिक्षा केंद्र क्रमांक- ०१४३ मधील परिक्षा केंद्रात पाच शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण विद्यार्थी ४६८ प्रविष्ट झाले आहेत

या परिक्षा केंद्रातील पाच शाळा खालील प्रमाणे आहेत. श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिंगवे, पंडित जवाहलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर,दत्तात्रय वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय दत्तात्रयनगर, पारगाव श्री गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय संविंदणे या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या परिक्षा केंद्राचे उद्घाटन पारमार्थिक सेवा संघाचे, संचालक शांताराम ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना परिक्षा सूची मधील नियम सांगितले. तसेच बेलचे वेळापत्रक सांगितले व परीक्षेसाठी स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव ढोबळे यांनी परिक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपच प्रज्ञाताई कुलकर्णी, विजया लोंढे, बाळासाहेब पडवळ. मुख्याध्यापक दत्तू खाडे , सखाराम पुंडे तसेच प्राचार्य प्रकाश सुतार , आदी मान्यवर व पालक,शिक्षक उपस्थित होते.

विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे असून विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे, शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स ,फॅक्स, इत्यादी, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

विद्यालयात पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे, शंभर मीटरच्या परिसरात झेरॉक्स ,फॅक्स, इत्यादी, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रसंचालक कैलास येलभर, उपकेंद्र संचालक अरुण गोरडे या केद्रातील परिक्षेचे काम पाहिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.