आरोग्य व शिक्षण

सोमवतीच्या पार्श्वभूमीवर धामणी(ता.आंबेगाव) येथे भाविकांची गर्दी!! खंडोबाच्या पालखीची मिरवणूक संपन्न!!

धामणीत सोमवतीला भाविकांची गर्दी खंडोबाच्या पालखीची मिरवणूक!!

धामणी (ता. आंबेगाव) येथे सोमवतीच्या निमित्ताने कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली माघ महिण्यातील शेवटचा सोमवार (२०फेब्रुवारी) असल्यामुळे आजच्या सोमवतीला विशेष महत्व होते. सकाळी वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी मंदीरात नेऊन देवाचा पंचधातूचा मुखवटा भगत मंडळीकडून घेऊन व पालखीत ठेवून वाजतगाजत भगताच्या विहीरीवर आणण्यात आला सोमवतीच्या ओट्याचा जिर्णोध्दार करण्यात आलेला असल्याने या नवीन ओट्यावर यावेळी सोमवतीचे मानकरी नरके,गावडे,राजगुरु,पडवळ,आवटे, पंचरास मंडळीच्या हस्ते देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यात आले व त्या ओट्याचे मानकरी मंडळीच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यानंतर अभिषेक व पूजा पार पडल्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी महिला भाविकांची मोठी गर्दी होती त्यानंतर देवाचे पूजारी दादाभाऊ भगत ,प्रभाकर भगत.सुभाष तांबे,माऊली जाधव (वाघे) सिताराम जाधव,राजेश भगत,नामदेव वीर.दिनेश जाधव शांताराम भगत, या भगत तांबे वाघे वीर सेवेकरी मंडळीनी पारंपारिक पूजा केली सोमवतीचे व देवाच्या मानाच्या काठीचे मानकरी मंंडळीचा सरपंच सौ रेश्मा बोर्‍हाडे,माजी सरपंच सागर जाधव अक्षय विधाटे सुभाष तांबे,अजित बोर्‍हाडे,बाळासाहेब बढेकर उत्तमराव जाधव दादाभाऊ भगत यांनी ग्रामस्थाच्या वतीने मानाची टाॅवेल टोपी देऊन सत्कार केला त्यानंतर पालखीची गावातील पेठेतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन भंडार्‍याची उधळण करण्यात आली पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती सोमवतीचा खंडोबाच्या सेवेकरीचा पारंपारीक मान तळेगाव ढमढेरे येथील समस्त नरके मंडळीचा असतो कोरोनाच्या संसर्गामुळे गेली अडीच वर्षे खंडोबा देवाची सोमवती साजरी करण्यात आलेली नव्हती त्यामुळे अडीच वर्षानंतर सरत्या माघ महिण्यातील पहिलीच व यंदाच्या ,(२०२३)वर्षातील पहिली उगवती सोमवती अमावस्या असल्याने महाळूंगे पडवळ,तळेगांव ढमढेरे गावडेवाडी,गुंजाळवाडी,लांडेवाडी,बेल्हा ,पारुंडे ,पाबळ आणि पंचक्रोशीतल्या गावांमधील भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती धामणीच्या पंचरास मंडळीच्या पारंपारीक ताफ्यातील हालगी ढोलकी सनई ,संबळ,तुतारी व ताशाच्या निनादात मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन मिरवणूकीत भंडार्‍याची उधळण करण्यात आली देवाच्या पालखीच्या मिरवणूकीत बाहेरगावचे भाविक व मानकरी मंडळी व ग्रामस्थ सहभागी झाले होते पहाटे मंदिरात सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले कडक उन्हामुळे सकाळीच देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली होती यंदाच्या माही पुनवेनंतरच्या , पहिल्या सोमवतीला शिरुर.खेड.आंबेगांव.जुन्नर व पारनेर तालुक्यातील भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचाराच्या जागरण गोंधळ देवकार्यासाठी गर्दी केलेली होती नवविवाहीत वधूवर जोडीने दर्शनासाठी आलेले दिसत होते चारचाकी व दुचाकी वाहनांची मंदिर परिसरात रांग लागलेली दिसत होती खोबरे भंडारा व हार फुले विक्रीची दुकाने मंदिराच्या बाहेर थाटलेली होती सोमवतीच्या दिवशी खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याला स्नान घालण्यासाठी व पालखीचे दर्शनासाठी बाहेरगांवाहून व पंचक्रोशीतील गावांमधून येणार्‍या भाविकासाठी ग्रामस्थांच्या वतीने बुंदी भात आमटी या महाप्रसादाचे आयोजन केलेले होते १०००हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.