आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे हिंदुस्तान फीड लिमिटेड कंपनी च्या वतीने विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे हिंदुस्तान फीड लिमिटेड कंपनी च्या वतीने विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे हिंदुस्तान फीड लिमिटेड कंपनी च्या वतीने विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेतील संपुर्ण विद्यार्थांना ६८० वह्यांचे वाटप गरीब होतकरू मुलांना कंपनीमार्फत करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी महाजन साहेब,गदादे साहेब उपस्थित होते.

या वेळी त्यांनी कंपनीबाबत व कंपनीच्या धोरणांबाबत सविस्तर माहिती दिली.हिंदुस्तान कंपनीचे अधिकृत विक्रेते राजेंद्र टाव्हरे (डॉक्टर) यांच्या मार्फत वाटप झाले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन ढोबळे, मा.अध्यक्ष बजरंगशेठ देवडे, ग्रामपंचायत सदस्य किरण शेठ ढोबळे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य काळुराम लोखंडे, विविध कार्यकारी सोसायटी संचालक दिलीप शेठ ढोबळे ,संदिप दातखिळे,सिंधु टाव्हरे,शाळेचे मुख्याध्यापक संतोष लबडे सर ,हिंगे सर,चव्हाण सर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.