आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल प्रि- प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” संपन्न!!

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल प्रि- प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” संपन्न!!

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या प्रि- प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” साजरा करण्यात आला. यात प्रि- प्रायमरीचे शिक्षणाचा टप्पा पूर्ण करून इयत्ता पहिलीत प्रवेश करणार असल्याने पुढील शैक्षणिक प्रवासासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलने “ग्रॅज्युएशन डे”साजरा केला.

कोवळ्या लहान वयात विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळावे हा संकुलाचा प्रमुख उद्देश असतो यासाठी शिक्षणसोबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते असते .एखाद्या पदवी अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या पदवी प्राप्त विद्यार्थी आनंद व्यक्त करतो.त्याच प्रकारे प्रि- प्रायमरीच्या विद्यार्थीनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी नर्सरी पासून ते एल.के.जी , यु .के.जी पर्यंतचा प्रवासात त्यानी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल व वर्षभरातील कला-गुणाचे कौतुक करण्यात आले.तसेच पालक, शिक्षक यांनी शैक्षणिक प्रगतीबाबत संकुलाचे आभार मानले.

यावेळी प्रमुख अतिथी संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, वृषाली जाधव मॅडम,स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड, प्रवीण मोरे , प्राचार्य आशिष काटे, उपप्राचार्य जालिंदर हासे, स्टेट बोर्ड प्राचार्य पंकज बडगुजर,उपप्राचार्य शारंगधर बावस्कर आदीमान्यवर हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यासाठी प्री – प्रायमरी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. राजश्री आबनावे , शीतल पोळ, शुभांगी गायकवाड व शिक्षक शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.