आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वडगावपीर,मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे १ एप्रिल २०२४ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत संपन्न होणार श्री पिरसाहेब यात्रा उत्सव!!

वडगावपीर(ता.आंबेगाव) येथे श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे आयोजन!!

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सव सोमवार दि.१ एप्रिल २०२४ ते बुधवार दि.३ एप्रिल २०२४ असे तीन दिवस संपन्न होणार आहे.सोमवार दि.१ एप्रिल २०२४ रोजी सांयकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत संदल,मंगळवार दि.२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता देवास शेरणी व दंडवते, २ व ३ एप्रिल २०२४ अशा दोन दिवस सकाळी आठ ते सात वाजता बैलगाड्याच्या भव्य शर्यती संपन्न होणार आहेत. बैलगाड्यांसाठी एकूण इनाम ३,५१,९००/- रुपये असून, प्रथम क्रमांकासाठी ७५,५५५-/ रुपये, द्वित्तीय क्रमाक-६५,५५५/ रुपये, तृत्तीय क्रमाक-५५,५५५/ रुपये, चतूर्थ क्रमाक-३५,५५५/ रुपये तसेच फायनलसाठी प्रथम क्रमांक-३१,००१/ रुपये,द्वित्तीय क्रमाक-२१,१०१/ रुपये,तृतीय क्रमांक-११,००१/ रुपये, चतुर्थ क्रमांक ९,००१/- पाचवा क्रमांक ७,००१/- घाटाचा राजा ११,१११/ रुपये,वीस फूटावर कांडे-५,५५५/ रुपये तसेच पहिल्यात पहिला येणा-या गाड्यास -९००१/ रुपये, दुसर्यात पहिला येणार्या गाडयास-७००१/ रुपये, तिसर्यात पहिल्या येणार्या गाडयास-५००१/ रुपया,चौथ्यात पहिला येणार्या गाडयास-३००१/ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.तसेच सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या गाड्यास (सन २०२४ ते २०२६) गाड्यास ५ दुचाकी किंवा रोख रक्कम रुपये ३,५१,००१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वाजता अंजलीराजे नाशिककर यांचा लोकनाटय तमाशाचा करमणूकीचा कार्यक्रम होईल.बुधवार दि.३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ वडगावपीर-मांदळेवाडी,मुंबई,पुणे व शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठान व सर्व मंडळे असे ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.