आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

टीव्हीएसच्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या मार्फत जागतिक पाणी दिवस साजरा!!

टीव्हीएसच्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्टच्या मार्फत जागतिक पाणी दिवस साजरा!!

वडगावपीर – TVS कंपनीच्या श्रीनिवासन सर्विसेस ट्रस्ट मार्फत जागतिक पाणी दिनाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमामध्ये मुलांना पाण्याचे महत्व सांगितले.
TVS कंपनीच्या CSR विभागामार्फत आंबेगाव,खेड,शिरूर तालुक्यामध्ये ग्रामविकासाचे काम चालू आहे.यामध्ये आर्थिक विकास,आरोग्य,पाणलोट विकास,पर्यावरण व पायाभूत सुविधा याविषयावर काम केले जाते.

TVS मार्फत जागतिक पाणी दिवस जिल्हा प्राथमिक शाळा वडगावपीर या ठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी प्रगती हायस्कुल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विध्यार्थीमध्ये पाण्याचे महत्व यासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी श्री.संतोष चौधरी हे प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आले होते.

या प्रसंगी प्रगती हायस्कुल वडगावपीरच्या प्राचार्य सौ.भालेराव मॅडम व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीरचे मुख्याध्यापक,प्र.केंद्रप्रमुख श्री.भगवान टाव्हरे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गावडे सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुशांत पवळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.पुष्पा लंके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी TVS SST च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

मानवी जीवनात असणारे पाण्याचे महत्त्व त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनाची गरज,पर्जन्य अनियमितता ,जागतिक तापमान वाढीची कारणे व परिणाम, हवामान बदलाचे परिणाम,पाणी जिरवण्याचे महत्त्व व गरज,पाणलोट विकासाच्या उपचार पद्धती, पाणी बचतीचे महत्त्व,पाणी वापराचे सुयोग्य नियोजन या विविध विषयांवर विद्यार्थीना समजेल अशा सध्या सोप्या भाषेत श्री संतोष चौधरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सर्व उपस्थितांनी जागतिक पाणी दिवसानिमित्त पाणी वाचवण्यासाठी शपथ घेण्यात आली

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.