आरोग्य व शिक्षण

वडगावपीर(ता.आंबेगाव) यात्रेत धावले १३० बैलगाडे,घाटाचा राजा कै. फक्कडराव मार्तंड शिंदे यांनी पटकविला मान!!

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील बैलगाडा घाटातील काही क्षण.

वडगावपीर यात्रेत धावले १३० बैलगाडे,घाटाचा राजा कै. फक्कडराव मार्तंड शिंदे यांनी पटकविला मान!!

वडगावपीर (ता.आंबेगाव) भिर्र… भिर्र…. भिर्र… उचल … कि टाक…. सेकंद…..येथे श्री पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त बुधवार ( दि.१५) रोजी बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १३० बैलगाडा मालकांनी या शर्यतीत सहभाग नोंदवला व घाटाचा राजा कै.फक्कडराव मार्तंड शिंदे यांनी मान पटकविला तर फळीफोड प्रथम क्रमांक साई किरण गावडे ( पूर ), द्वित्तीय क्रमांक विकास ज्ञानेश्वर पंचरास (लोणी ), तृत्तीय क्रमांक अंकूश महादू बढेकर ( धामणी ), चतुर्थ क्रमांक पै.गोरक्ष दत्तोबा सासवडे ( शिक्रापूर ) हे फळीफोड गाडे ठरले. तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक विशाल कोंडीभाऊ वाळूंज ( लोणी ), द्वित्तीय क्रमांक सुरेश रामभाऊ वाघ ( राजंणी ), तृत्तीय क्रमाक गणेश सुभाष लांघे ( तेजेवाडी ) यांनी बाजी मारली. यात्रा उत्साव काळात तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी यात्रेला भेटी दिल्या.घाटाचे नियोजन माजी सरपंच संजय पोखरकर,रमेश आदक,विश्वनाथ साबळे,अरुण पोखरकर,सरपंच कोंडीभाऊ आदक,रामदास पालेकर,खरेदी विक्री संघाचे संचालक फकिरा आदक,पै.विजय आदक, रवि ढगेपाटील, तुकाराम आदक, सावळेराम आदक व ग्रामस्थांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.