आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्री.शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1500 महिलांनी घेतले श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन !!

श्री. शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघातील 1100 भाग्यवान महिलांना श्री क्षेत्र सप्तशृंगी माता वणी येथे एकदिवसीय धार्मिक सहल आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित राहुन महिला भाविकांना मार्गदर्शन केले.

या वेळी मनोगत व्यक्त करताना आढळराव पाटील म्हणाले की,
मागिल 2 वर्ष ही कोरोना सारख्या भयानक आजाराचे संपूर्ण जगावर सावट होते. या भयानक व भयावह आजाराने अनेक कुटुंब उध्वस्त झाली. मागिल 2 वर्षाचा हा काळ आता भूतकाळ झाला आहे.असा काळ कधीही कोणाच्या आयुष्यात परत फिरून येऊ नये.हा काळ हटल्यानंतर माझ्या माता – भगिनींना चार आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, अहोरात्र आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या माझ्या माता-भगिनींना आनंदाचे काही क्षण लुटता यावेत अशी भावना माझ्या मनात होती. हाच विचार मी शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान च्या सहकार्‍यांना बोलून दाखवला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या धार्मिक सहलीचे आयोजन केले.

या सहलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विविध पदाधिकारी यांनी नियोजनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता त्यामुळे 1100 ऐवजी 1500 महीला यात सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती सागर काजळे यांनी दिली.

या वेळी या सहलीत सहभागी भाविक महिलांना शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान कडून आकर्षक भेट वस्तू सप्रेम भेट देण्यात आली. कमी कालावधीत इतक्या सुंदर पद्धतीने या सहलीचे आयोजन केल्या बद्दल आयोजक सागर काजळे, योगेश बाणखेले यांचे सहभागी महिलांनी आभार मानले.

या सहलीचे नियोजन अशोक (मामा) गव्हाणे, रमेश खरमाळे, हनुमंत तागड संतोष पाचपुते, धनेश मोरडे, सप्नील बेंडे, माऊली लोखंडे, प्रशांत काळे,प्रतिक काळे ,काळुराम लोखंडे, रामदास जाधव यांनी केले. या प्रसंगी सुनिल बाणखेले, अरुण गिरे, देविदास दरेकर, शिवाजी राजगुरू, आबा लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.