आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

अवघी धामणी झाली भक्तिमय!!धामणीत ज्ञानोबा माऊलींचा गजर!!

अवघी धामणी झाली भक्तिमय!!धामणीत ज्ञानोबा माऊलींचा गजर!!

ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत टाळ मृदंगाच्या तालावर धामणी ता आंबेगाव येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि. कॉलेज धामणी मध्ये दिंडीचा सोहळा रंगला होता. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही लागली आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होत नसले तरी वारीचा अनुभव मात्र मुलांना यावा त्यासाठी विद्यार्थ्यांचे पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांच्या हस्ते शाळेत विठ्ठल रुक्माई च्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या विभाग प्रमुख सौ राजगुरू मॅडम यांनी दिंडीचे नियोजन केले व सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून हनुमान मंदिरात च्या समोर, तसेच ग्रामपंचायतच्या समोर, गावच्या वेशीच्या समोर, विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून टाळ मृदुंगाच्या तालासुरावर ठेका धरला विद्यार्थिनी फुगड्या खेळून दिंडीचा आनंद घेतला. पालखीचे पूजन ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेश्मा ताई बोऱ्हाडे, मा. सरपंच अंकुश भुमकर , ग्रा.प . सदस्य अक्षय विधाटे , तंटामुक्ती अध्यक्ष नितिन जाधव वि.वि.का. सोसायटीचे चेअरमन कोंडीभाऊ तांबे , व्हा चेअरमन रामदार विधाटे , मा . चेअरमन बाळासाहेब विधाटे , मा.ग्रा.प. सदस्य दिपक जाधव ,शिवतीर्थ पतसंस्था व्हा चेअरमन आनंदराव जाधव , अमोल जाधव , गणेश जाधव , कोंडिभाऊ बढेकर , रोहित भुमकर , गणपत भंडारकर , संदिप आळेकर , योगेश विधाटे , बळीराम बोऱ्हाडे , हनुमंत जाधव , पमाजी पंचरास उपस्थित ग्रामस्थानच्या हस्ते झाले. सर्व ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेलले.दिंडीची समाप्ती विद्यालयात आरती घेऊन करण्यात आली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.