ताज्या घडामोडी

अरे बापरे!!जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे दिवसाढवळ्या ग्रामस्थांना झाले बिबट्याचे दर्शन!!

अरे बापरे!!जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे दिवसाढवळ्या ग्रामस्थांना झाले बिबट्याचे दर्शन!!

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज सकाळी 8 वाजता जारकरवाडी गावच्या मा. सरपंच सौ.सरुबाई राजेंद्र लबडे, गोरक्ष शिवराम जारकड, हेमंत अशोक जारकड यांच्या शेतात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले. जनावरांसाठी चारा स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या गवतात, मका पिकात बिबट्याचे ठसे आढळुन आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

जारकरवाडीतील हा परिसर ऐन लोकवस्तीत आहे. जनावरांना चारा काढण्यासाठी शेतकरी शेतात जात असतात. या पूर्वी या परिसरात रात्री बिबट्या दिसून आला होता. मात्र आज सकाळीच बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी लोकांनी फटाके वाजवले. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी जारकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.