आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

चाटोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई खेलुकर यांची बिनविरोध निवड!!

चाटोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जिजाबाई खेलुकर यांची बिनविरोध निवड!!

नाशिक ( प्रतिनिधी-भुषण चोबे):- निफाड तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायत सरपंचपदी जेष्ठ सदस्या जिजाबाई दत्तूमामा खेलुकर यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने अरुणा हांडगे यांनी सरपंचपदाचा नुकताच राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी, मंडल अधिकारी पी.पी.केवारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी जिजाबाई खेलुकर यांचा एकमेव अर्ज आला. या अर्जावर सूचक म्हणून सदस्य भाऊसाहेब घोलप यांनी स्वाक्षरी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी केवारे यांनी जिजाबाई खेलूकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी घोषणा केली.

यावेळी ग्रामसेविका सनेर मॅडम, तलाठी देवरे तात्या, माजी सरपंच अरुणा हांडगे, उपसरपंच समाधान खेलुकर, बाळासाहेब हिरे, ग्रा.सदस्य अनिता कदम, भाऊसाहेब घोलप, द्रौपदा भोईर, सविता डमाळे, सारिका हांडगे, राहुल गायकवाड, शोभा घोलप,भाऊसाहेब सोनवणे,लक्ष्मण धोंगडे यांसह मा.जि.प.सदस्य सिद्धार्थ वनारसे, संचालक शिरीष बापू गडाख, चांदगिरीचे सरपंच रमेश कटाळे, रामहरी कटाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा हिरे, पो.पाटील सचिन हांडगे, दिलीप कदम, दीपक पाटील कदम, राजेंद्र खेलुकर, शांताराम हांडगे, राजेंद्र कटारे, नारायण वरखेडे, सुदाम खालकर, मधुकर शिरसाठ, रामदास ढोमसे, सुभाष हांडगे, नारायण खेलुकर, विजय खेलुकर, कचरू खेलुकर, सुरेश खेलुकर, भिवसन खेलुकर, मयुर हांडगे, नंदू घोलप, पुंडलिक हिरे, शरद लभडे राजू खेलुकर,अनवर सय्यद,अलीम पटेल,पप्पू शेख, परवेज शेख, मतीन पटेल, मोनू पटेल, शहबाज शेख, योगेश गारे, अंबादास गारे, कैलास गारे, रुकमत नवरे, विजू कटारे, अमोल गांगुर्डे, विनोद गोडे, राजेंद्र दिघे, देवराम खेलुकर, खंडू भोईर, महेश खेलुकर, सुभाष खेलुकर, सुनील हांडगे, संपतराव वरखेडे, दत्तू नाठे, दौलत घोलप, भगवान गाडे, अमोल हिरे, अरुण कर्डक, संजय खेलुकर, अशोक डमाळे, गणेश वाणी, गणेश खेलुकर, कोंडाजी खेलुकर, सतीश वरखेडे, संजय घोलप, अनिल हिरे, बाळु कटारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चाटोरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जिजाबाई खेलूकर यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.