आरोग्य व शिक्षण

थापेवाडी (ता.शिरूर ) येथील शेतकरी श्री.सचिन श्रीराम गव्हाणे यांच्या शेळीच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला!!

थापेवाडी (ता.शिरूर ) येथील शेतकरी श्री.सचिन श्रीराम गव्हाणे यांच्या शेळीच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला!!

शिरूर- आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर पाबळ गावानजीक असलेल्या थापेवाडी (ता.शिरूर) येथील शेतकरी श्री. सचिन श्रीराम गव्हाणे यांच्या शेळीच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यात 8 महिन्याची 5 करडे व 1 शेळी मृत्युमुखी पडली आहे. यात गव्हाणे यांचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या परीसरात मागील 2 महिन्यात बिबट्यांचा बावर वाढला आहे. थापेवाडी जवळून बेल्हा – जेजुरी महामार्ग गेला आहे. या रस्त्यावर बिबटे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडले होते. या परिसरातील दडन क्षेत्र ही कमी आहे. अन्न- पाण्याच्या शोधार्थ बिबटया लोकवस्तीत प्रवेश करतो आहे. या परीसरात वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.