आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील लोणी(धामणी) येथे नागपंचमी निमित्ताने रंगणार कलगीतुरा सामना!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी(धामणी) येथे नागपंचमी निमित्ताने रंगणार कलगीतुरा सामना!!

लोणी (ता.आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी दरवर्षी कलगी-तुऱ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार (दि. 21) रोजी कलगीतुऱ्याचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शाहीर रामदास गुंड (तुरेवाले) पारनेर व शाहीर नानासाहेब साळुंखे ( कलगीवाले) श्रीगोंदा यांच्यात हा सामना रंगणार आहे.
लोणीत कलगी तुरा कार्यक्रमाची सुरुवात सन 1993 मध्ये झाली असुन चालु वर्ष हे २९ वे वर्ष आहे.हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्तर पुणे जिल्हा व नगर नाशिक
आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोते वर्ग उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम लोणी येथे होत असतो. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कलंगीतुऱ्याचा बहारदार कार्यक्रम पार पडतो.या कार्यक्रमासाठी साधारण दहा ते पंधरा हजार श्रोत्यांचा जनसमुदाय उपस्थित असतो.

या कार्यक्रमात पौराणिक, धार्मिक, सामाजिक आदी विषयावरती कलंगी तुरा म्हणणारे गायक व साथीदार इथे बहारदार कार्यक्रम सादर करतात. गेल्या 28 वर्षापासून कोरोनाचा दोन वर्षांचा कालखंड वगळता या कार्यक्रमाला खंड पडलेला नाही. सदर कार्यक्रमासाठी लोक उत्स्फूर्तपणे देणगी देतात. नागपंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमामध्ये शाहीर आपल्या हिंदू धर्माच्या पौराणिक कथा व नवीन विषयावर गीते त्यां ठिकाणी सादर करतात.कार्यक्रमांमध्ये शाहीरांनी केलेल्या सवाल-जवाबाची माहिती सूत्रसंचालन करणारे लोणीचे माजी सरपंच उद्धवराव लंके हे श्रोत्यांना सविस्तर सांगतात. या कार्यक्रमाची सुरुवात लोणी गावातील लोकनाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले पंचरास मंडळी,कलावंत आपल्या नांदीने करतात. सर्व कार्यक्रमाचे नियोजन कलगी तुरा मंडळ व लोणी ग्रामस्थ करत असतात.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.