आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

आंबेगाव तालुक्यातील बुथप्रमुख व शिवदूत यांची बैठक लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे उत्साहामध्ये संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील बुथप्रमुख व शिवदूत यांची बैठक लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे उत्साहामध्ये संपन्न!

आंबेगाव तालुक्यातील बुथप्रमुख व शिवदूत यांची बैठक लांडेवाडी ता.आंबेगाव येथे उत्साहामध्ये संपन्न झाली. या बैठकीस शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्यासह शिवसेना जनकल्याण कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नचिकेत खरात तसेच या विभागाचे पुणे जिल्हा प्रमुख अविनाश राऊत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांशी बोलताना गावोगावी गाव तिथे शिवसेना शाखेचा बोर्ड लावण्यासह बूथ प्रमुख व शिवदूत यांचे कार्य व जबाबदाऱ्या याबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. शिवसैनिकांनी अंग झटकून लोकांच्या मदतीला धावून जावे, राज्याचे नेतृत्व आपल्या सर्वांच्या हक्काचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर कुठलीही कमतरता शिवसैनिकांना भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुख संतोष डोके, पंचायत समितीचे मा.सदस्य रविंद्र करंजखेले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मालतीताई थोरात, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव राजगुरू यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व बूथप्रमुख, शिवदूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.