आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महा आरोग्य शिबिरामध्ये राजुरी येथे २२२९ रुग्णांना मोफत तपासणी व उपचार!!

शेळके कुटुंबियांचा 'आई' च्या स्मरणार्थ स्तुत्य उपक्रम!!

महा आरोग्य शिबिरामध्ये राजुरी येथे २२२९ रुग्णांना मोफत तपासणी व उपचार!!
शेळके कुटुंबियांचा ‘आई’ च्या स्मरणार्थ स्तुत्य उपक्रम!!
कै.गं.भा.हौसाबाई गंगाराम शेळके यांच्या स्मरणार्थ एस एम बी टी हॉस्पिटल,घोटी (नाशिक),बुधरानी हॉस्पिटल पुणे,समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बेल्हे (बांगरवाडी) व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर,सर्वरोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी राजुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडले.
ह.भ.प.तुळशीराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक शेठ औटी,सरपंच प्रियाताई हाडवळे,समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम डी घंगाळे,अशोक शेठ औटी,बाळासाहेब औटी,जी के औटी,संदिप औटी,राजेश कणसे,ऍडव्होकेट शिवाजी औटी,गणेश हाडवळे,भास्कर बांगर,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,शाकीर चौगुले,गौरव घंगाळे,रुपाली ताई औटी,निर्मला हाडवळे,सुवर्णा ताई गटकळ,निलेश हाडवळे,पांडुरंग औटी,रामदास सरोदे,सचिन भोजने,बबनराव हाडवळे,प्रदीप डुंबरे,जानकू शेठ डावखर,लहुशेठ गुंजाळ,सुरेश शेठ बोरचटे,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० शिबिरार्थी-स्वयंसेवक आदी उपस्थित होते.शिबिरादरम्यान विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी देखील सदिच्छा भेट दिली.
एस एम बी टी हॉस्पिटल घोटी (नाशिक) येथून १५ डॉक्टरांची टीम या शिबिरात दाखल झाली होती.
बुधरानी हॉस्पिटल पुणेहून ६ डॉक्टरांची टिम उपस्थित झालेली होती.
बुधरानी हॉस्पिटल पुणे मार्फत १३५३ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.त्यापैकी २११ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर २०० रुग्णांना डोळ्यांचे ड्रॉप देण्यात आले.
डोळ्यांचा मोतीबिंदू,काचबिंदू,लासुर्वे, डोळ्यातून सतत पाणी येणे,डोळा पडद्यावर वेल याप्रकारच्या विविध शस्रक्रिया करण्यात येणार असून त्यातील पहिल्या ३८ लोकांची बॅच शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आली.
एस एम बी टी हॉस्पिटल च्या वतीने हृदयरोग,कॅन्सर निदान व उपचार,स्त्रियांचे आजार,पोटाचे आजार व शस्त्रक्रिया,बालरोग विभाग,तोंडाचे व दातांचे आजार,त्वचेचे आजार,अस्थिरोग हाडांचे आजार,संधिवात,मेंदू,किडनी,कान,घसा संबंधित आजार,मुळव्याध,भगंदर,फिशर,मधुमेह,लघवी व रक्त शर्करा तपासणी तसेच सर्व रोगनिदान उपचार व तपासणी या सर्व आजारासंबंधीच्या चाचण्या व शस्त्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला होता.त्यामध्ये एकूण ८७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी ६१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी एस एम बी टी हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार आहे.हाडांचे आजार असलेल्या १९ रुग्णांना,जनरल शास्त्रक्रियेसाठी १७ रुग्णांना,स्त्रियांचे आजारासंबंधी ८ रुग्णांना,त्वचेचे विकारासंबंधी १३ रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटल घोटी येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती वल्लभ शेळके यांनी दिली.
या शिबिराचा राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील विविध गावातील रुग्णांनी व पंचक्रोशीतील जवळपास २२२९ रुग्णांनी लाभ घेतला.
संपूर्ण शिबिरामध्ये विशेष सहकार्य म्हणून ग्रामपंचायत राजुरी,शरदचंद्र नागरी पतसंस्था राजुरी,ज्ञानदीप पतसंस्था राजुरी,आदर्श पतसंस्था राजुरी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी,जनता विकास मंडळ व विद्या विकास मंदिर राजुरी व समस्त ग्रामस्थ राजुरी तसेच समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेल्हे यांचे सहकार्य लाभले.यामध्ये सहभागी रुग्णांना आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजना इत्यादी मध्ये समाविष्ट सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.