आरोग्य व शिक्षण

पारगाव (ता.आंबेगाव) येथे पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा!!

पारगाव (ता.आंबेगाव) येथे पोलीस स्टेशनच्या वतीने  जागतिक महिला दिन साजरा!!

 

पारगाव (ता.आंबेगाव) येथे पोलीस स्टेशनच्या वतीने  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास सहा. पोलीस निरीक्षक लहु थाटे, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या, हद्दीतील सर्व महिला सरपंच व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या, महिला पोलीस पाटील कल्पिता बोराडे, लाखनगाव, कल्पना चौधरी, शिरदाळे, महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या, महिला सरपंच व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला -वैशाली पोहकर, नागापूर, डॉ. ज्योती वाघ, पारगाव, प्रा. पूजा अरगडे, प्रा. मनीषा बढे, डी. जी. वळसे पाटील कॉलेज पारगाव कारखाना, वकील मनीषा मस्के, ज्योती गोरडे (उद्योजिका), शोभा लबडे (उपसरपंच पारगाव) प्रज्ञा कुलकर्णी (माजी सरपंच पारगाव), शांता चव्हाण (माजी सरपंच पारगाव), सुवर्णा रोडे, वर्षा रोडे, वंदना तांबे (सरपंच शिरदाळे), भारती देठे, दिपाली खांडगे (सरपंच देवगाव), मीरा पोखरकर (सरपंच वडगाव पीर), उर्मिला धुमाळ (सरपंच लोणी), जयश्री रोकडे तसेच पोलीसस्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी महिला पोलीस शिपाई निशा गुळवे व शामल तळेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे उपस्थित सर्वच्या सर्व महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले. व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक महिला दक्षता समितीच्या वैशाली पोहकर (माजी सरपंच नागापूर) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांची ओवी गाऊन करण्यात आली. आभार प्रदर्शनाचे काम जवळे या गावचे पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.