आरोग्य व शिक्षणसामाजिक

अक्षय शिवाजीराजे विधाटे!!समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता!!

अक्षय!!!! शिवाजी राजे विधाटे यांच्या अकस्मित निधनानंतर शिवसेना परिवारामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती.. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा तर उजवा हातच गळून पडला होता!! परंतु या सगळ्यावर काळ हाच एक उपाय होता कदाचीत!! शिवाजी राजे नंतर अवघ्या सात आठ वर्षांमध्ये अक्षय समाजकारणात आला.. राजासारखंच मनमिळाऊ व्यक्तिमत्व!!!शिवसेनेच्या विचारधारेप्रमाणे कोणतेही संकट कोणावरही येऊ दे ,अक्षय त्या संकटाचा सामना करण्यासाठी सदैव हजर!!दिवस असो रात्र असो अक्षय मदतीला धावणार म्हणजे धावणारच!गोर-गरिबांची रेशनिंग कार्ड, वीज बिल अशी छोटी मोठी काम स्वतः होऊन करण्यासाठी धावणारा अक्षय!!घरामध्ये दोन भावांची भांडणे झाली,वस्तीमध्ये बांधावरून,घराच्या जागेवरून विचारांच्या मतभेदावरून कुरकुर झाली की अक्षय कुठे आहे? याची आठवण सर्वसामान्य माणसाला होणारच!!आणि याच आठवणीतून अक्षय पुढे धावणार ,स्वतःला जमलं तर स्वतः मिटवणार नाही जमलं तर गावच्या सरपंचांना, तंटामुक्तीचे अध्यक्ष ला सागरला फोन करणार !!परंतु त्या लोकांची भांडणे मिटवणारच!!असा धामणी गावातील गोरगरिबांचा मसीहा एक समाजसेवक!!अक्षय खरं म्हणजे या त्याच्या गुणांमुळेच आमच्या वहिनींना गेल्या पंचवार्षिक मध्ये सदस्य होण्याची संधी मिळाली. गावाने वहिनींना उपसरपंचही केल….उपसरपंच संगीता वहिनी! ज्यांनी राजांना आयुष्यभर साथ दिली!!अक्षयच्या पाठीमागे उभे राहिल्या!! त्या गावच्या उपसरपंच झाल्या…गावची निवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी भूमिका…. गावातील 80 टक्के लोकांनी त्याला साथही दिली.आणि ह्या पंचवार्षिक मध्ये संपूर्ण गावाने एकत्र येऊन अक्षयला सदस्य केले..थोड्या दिवसांमध्ये अक्षय गावचा उपसरपंच होईल !!एकंदर जो माणूस चांगलं काम करतो जो कार्यकर्ता स्वतःला झोकून देऊन काम करतो त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे संघटना व गाव राहते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अक्षय!!!फक्त गावात नाही तर तालुक्यातही खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो.. म्हणूनच दादांनी त्याला युवासेनेचा उपतालुकाप्रमुख केले. या माध्यमामधून तो तालुक्यामध्ये शिवसेनेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे करतो आहे… एका बाजूला पक्ष आणि एका बाजूला गाव परंतु गावात आला की मी कोणत्याही पक्षाचा नाही! मी फक्त गावचा ही भूमिका अक्षय तंतोतंत पाळतोय .खरं म्हणजे गावामध्ये सागर व अक्षय ही जोडी सध्या गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये दंग आहे …या दोघांची मैत्री गावात चर्चेचा विषय आहे .असो मी अक्षयला त्याच्या या जन्मदिनी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो..त्याच्या हातून देव,देश आणि धर्माची सेवा घडो अशी अपेक्षा ठेवतो व त्याला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो …सदैव आपलाच …रवींद्र करंजखेले(मा.पंचायत समिती सदस्य आंबेगाव तालुका)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.