आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

मेंगडेवाडी(ता.आंबेगाव) येथे स्वस्त धान्य दुकानांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आनंदाचा शिधा” वाटप सुरू !

मेंगडेवाडी स्वस्त धान्य दुकानांत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “आनंदाचा शिधा” वाटप सुरू !!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून “आनंदाचा शिधा वाटप” ही योजना जाहीर केली होती.

या योजनेअंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश करण्यात आला असून आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शिवसेना तालुकाप्रमुख मा.अरुणभाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.

युवासेना जिल्हा समन्वयक मा.सुनिल गवारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती सरकारच्या धोरणांचे स्वागत करून हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, आदिवासी बांधव व महिला भगिनींसाठी काम करत असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याची भावना व्यक्त केली. दिवाळी निमित्त आनंदाचे शिधावाटप व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजारांचे विशेष अनुदान थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष आभार मानले.

यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे कर्मचारी श्री लोखंडे, अविनाश मेंगडे, नवनाथ चक्कर, दिपक गायकवाड विठ्ठल मेंगडे, प्रतिक मेंगडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.