लायन्स क्लब ऑफ तळेगाव च्या वतीने खडकवाडी(ता. आंबेगाव) च्या माध्यमिक विद्यालयास 16 सिलिंग फॅन झाले उपलब्ध!!

आज दि. 31ऑक्टोबर रोजी माध्यमिक विद्यालय खडकवाडी(ता. आंबेगाव) येथे लायन्स क्लब ऑफ तळेगाव मा.अध्यक्षा, विद्यमान चेअरमन सौ. प्रमिलाताई वाळुंज पा.तसेच लायन्स क्लबचे मा. अध्यक्ष श्री सुनील भाऊ वाळुंज पा. यांच्या सहकार्यातून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी १६ सिलिंग फॅन उपलब्ध करून दिले. याप्रसंगी
जिल्हा परिषद मा.अध्यक्ष अरुणभाऊ गिरे,पंचायत समिती सदस्य मा.रविन्द्र करजंखीले, खडकवाडी गावचे मा.सरपंच अनिल शेठ डोके, मा.चेअरमन नाथा (अण्णा) सुक्रे,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक उदयशेठ डोके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश नाना सुक्रे, उपसरपंच एकनाथ शेठ सुक्रे ,मा सरपंच काशिनाथ वाळुंज मा.अध्यक्ष श्री गुलाब शेठ वाळुंज,माऊली कृपा सोसायटी संचालक संतोष रामा सुक्रे मा.चेअरमन विलास मामा सुक्रे, मा.अध्यक्ष दादाभाऊ वाळुंज,मा.अध्यक्ष दिलीप आप्पा डोके ग्रामपंचायत सदस्य अदिनाथ सुक्रे,संतोषशेठ डोके उपस्थित होते.
या वेळी मा.अध्यक्षा प्रमिलाताई वाळुंज यांनी शाळेसाठी व मुलासाठी लागणार्या गरजेच्या वस्तु मिळवण्यासाठी प्रयत्न करनार असल्याचे सांगीतले.
प्राचार्य घुले सर,मा.उपसरपंच किरण वाळुंज,ढवळे सर,रोडे सर यांनी लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांचे आभार मानले.