आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आदर्श गाव गावडेवाडी(ता.आंबेगाव)येथे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!!

आदर्श गाव गावडेवाडी(ता.आंबेगाव)येथे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!!

प्रतिनिधी-शिंगवे पारगाव
समीर गोरडे

आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाणारे व कला, शिक्षण, कृषी क्षेत्राबरोबरच धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणाऱ्या आदर्श गाव गावडेवाडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे तब्बल पस्तीस वर्षे ह्या साई युवक मंडळाच्या ह्या अविरत सेवेला झाले आहे मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत.नवरात्र उत्सवात दरवर्षी बैलगाडा शर्यती भरवण्यात आले होते यामध्ये तब्बल साडेपाचशे गाडे धावले , यशस्वी गाडेमालकांना मोठी बक्षिसे देखील देण्यात आली , तसेच दर दिवशी महाआरती, भजन, कीर्तन तसेच रास दांडिया व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या समोरच देवीची मूर्ती बसवलेली आहे त्याठिकाणी दररोज पहाटे महाआरती दुपारी प्रवचन कीर्तन सायंकाळची महाआरती हजारो भाविकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडत असतात तसेच रोज सायंकाळी ग्रामस्थांच्या सहकार्याने महा प्रसादाच्या जेवणांची देखील व्यवस्था करण्यात येते , आंबेगाव तालुक्याच्या पंचक्रोशीतील साई युवक नवरात्र उत्सव मंडळाचा आदर्श इतर गावे देखील घेतांना पहायला मिळत आहे .मंडळ हे पन्नास वर्षेकडे पदार्पण करत असताना मंडळाचे धोरण हे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पहायला मिळत आहे

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.