आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गावडेवाडी(ता.आंबेगाव)येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण!!

गावडेवाडी(ता.आंबेगाव)येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण!!

प्रतिनिधी- शिंगवे पारगाव
समीर गोरडे

आदर्श गाव गावडेवाडी येथे ग्रामपंचायत ,व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावडेवाडी गावात वनराई बंधारा बांधण्यात आला. शेतीतील कामे चालू असताना देखील गावातील जेष्ठ मंडळी तरुण सहकारी विद्यार्थ्यां, महिला बचत गटाच्या महिला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची ही महत्वकांक्षी योजना असून वनराई बंधारा बांधून पूर्ण झाल्याने. याचा फायदा पाणी अडवण्यासाठी होणार असून असे अनेक बंधारे जर बांधले तर त्याचा जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होऊन त्याचा फायदा गावाला होणार आहे.असे मत गावडेवाडीचे सरपंच विजय धोडींबा गावडे यांनी मांडले

प्रत्येक गावात असे वनराई बंधारे बांधण्याची गरज असून त्यातून जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. डोंगराळ भागात अधिकच्या प्रमाणात हे बंधारे होण्याची गरज असून त्या साठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याची गरज ग्रामस्थांनी अशा कामात एक तास भर जरी श्रमदान केले तर त्याचा मोठा

फायदा गावाला होईल. असे देखील गावडेवाडी गावच्या ग्रामसेविका दिपाली थोरात ह्यांनी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी गावडेवाडी सरपंच विजय धोंडीबा गावडे,उप सरपंच विनायक गावडे, वनविभागाचे वनपाल प्रदिप कासारे , वनरक्षक शिवशरण मॅडम, तसेच ग्रामपंचायत सेवक अर्चना गावडे , सुजाता हिंगे धंनजय पोखरकर , गंगाराम गावडे , वनमजूर अरूण खंडागळे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले यांनी देखील यात सहभागी होऊन श्रमदान केले. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची ही महत्वकांक्षी योजना असून वनराई बंधारा बांधून पूर्ण झाल्याने याचा फायदा पाणी अडवण्यासाठी होणार असून असे अनेक बंधारे जर बांधले तर त्याचा जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होऊन त्याचा फायदा गावाला होणार आहे. प्रत्येक गावात असे वनराई बंधारे बांधण्याची गरज असून त्यातून जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

डोंगराळ भागात अधिकच्या प्रमाणात हे बंधारे होण्याची गरज असून त्या साठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी अशा कामात एक तास भर जरी श्रमदान केले तर त्याचा मोठा फायदा गावाला होईल. सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्तिथी मध्ये त्याचा फायदा होईल.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.