आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संगितरत्न मा.दत्ता महाडीक पुणेकर या नावाची जादू आजही रसिकांच्या हृदयात जीवंत आहे.या महान कलावंताच्या स्मृतीस शत:प्रणाम!!

राजेंद्र डी.मोरे यांच्या लेखणीतून साभार!!

संगितरत्न मा.दत्ता महाडीक पुणेकर
*****************************

महाडीक आण्णा यांचा तमाशाफड बारामतीत किंवा आजूबाजूला आला आणि मी पाहिला नाही ,असे कधीच घडले नाही. महाडीकआण्णा अस्सल कलावंत होते.रसिकांच्यावर त्यांची छाप होती.
स्टेजवर महाडीकआण्णा आले तरी रसिकांना आनंद वाटत.आजही मी रोज युट्यूबवर महाडीकआण्णा यांची गाणी ,रंगबाजी ,वगनाट्ये पहात असतो.
मा.लक्ष्मण गिरी सराटीकर सांगतात ,महाडीकआण्णा वगनाट्ये बसविण्यात आणि कलावंताची निवड,करण्यात ,कलावंताच्याकडून कामे करून घेण्यात निष्णात ,तज्ञ होते.कलावंताची काळजी,कलावंताच्या पोटाला महाडीकआण्णा जपत,गरजेला धावून जात.आण्णा एक अलौकिक कलावंत फडमालक होते.
तिकीटविक्रीवर महाडीकआण्णा यांचा श्रीरामपूर रामनवमी उत्सवात कार्यक्रम पाहिला होता ,रसिकांची प्रचंड गर्दी ,तसेच शिंगणापूर येथे यात्रेत कार्यक्रम पाहीला प्रचंड गर्दी .
तमाशाचा सुंदर कार्यक्रम पहाण्यास मिळत. महाडीकआण्णा यांची गाणी, शेवटी वगनाट्ये असा बहरदार ,रंगदार कार्यक्रम होत.
महाडीकआण्णा यांना मी शेवटचे पाहीले ते तावशी ता.इंदापूर जि.पुणे येथे महाडीकआण्णा यांचेशी बोललो.
मी म्हणालो आण्णा तुम्ही आहात तोपर्यंतच एक दुसरे दत्तामहाडीक निर्माण करा,आण्णा हसत म्हणाले येथे कोणी कुणासारखे निर्माण होऊ शकत नाही, ज्याचे त्यांने स्वतः सारखे निर्माण व्हावे.कलेसाठी साधना,कष्ट महत्वाचे असते.
एक जबरदस्त भारदस्त आकाशाएवढया उंचीचे, महातेजस्वी महाज्ञानी, तमाशाकलावंत तमाशासृष्टीने व रसिकांनी महाडीकआण्णा यांचे रूपात पाहिले आहेत.विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर आणि महाडीकआण्णा यांची विनोदीजोडगोळीला महाराष्ट्रातील रसिक कधीच विसरू शकत नाहीत. महाडिकाआण्णा स्वतः दिग्गज कलावंत होते ,अनेक दिग्गज कलावंताच्या बरोबर काम केलेले आहे.
फडातील कलावंताचा आण्णांच्यावर जीव होता,
महाडीकआण्णा ही,कलावंताना जीव लावीत.
महाडीकआण्णा यांची मुलेमुली आपापल्या परीने आण्णांचा वारसा चालवित आहेत.आदरणीय वसंतराव जगतापआण्णा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी महाडीकआण्णा यांचा कलेचा वारसा पुढे चालवित आहेत.बेल्हे तमाशा लावणी महोत्सव महाराष्ट्रात गाजत आहे.जगतापआण्णा गाण्यातून महाडीक आण्णा जागवितात .
संगितरत्न मा.दत्ता महाडीक पुणेकर या नावाची जादू आजही रसिकांच्या हृदयात जीवंत आहेत.
या महान कलावंताच्या स्मृतीस शत: प्रणाम

राजेंद्र डी.मोरे

कलारसिक

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.