धामणी(ता.आंबेगाव) गावच्या सर्वांगीण विकासात्मक जडण-घडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या श्री.अंकुशराव भूमकर यांना मा.पंचायत समिती सदस्य श्री.रविंद्र करंजखेले यांनी त्यांच्या कार्याचा आलेख मांडत अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा !!

अंकुशराव …..
धामणी गावच्या सर्वसामान्य माणसाच्या तोंडून सहज निघते ते नाव म्हणजे अंकुश…मितभाशी….सहनशील याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंकुशराव!
आज तुमचा वाढदिवस …प्रथमता तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा! १४ ते १५ वर्षांपूर्वी अंकुश रावांचा धामणीच्या राजकारण व समाजकारणामध्ये प्रवेश झाला. पहिल्यांदा नको नको म्हणणारे अंकुशराव आता गावच्या राजकारणामध्ये गावचा एक अविभाज्य घटक झाले आहेत .ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच,सरपंच तसेच जलयुक्त शिवाराचे अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशी राहिली आहे.
जे काम किंवा जी जबाबदारी त्यांना मिळेल त्या जबाबदारीचे त्यांनी सोनं केलं.सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. या दुष्काळाला अंकुशराव पुरून उरले.टँकरची समस्या असो जनावरांचा चारा असो अथवा आजारी माणसाला आधार देण्याचे काम असो हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. जलयुक्त शिवाराचं काम करत असताना धामणी गावांमध्ये दोन वर्षांमध्ये अकरा कोटी रुपयांची कामे केली! गावामध्ये पाणी जिरवणे, अडवणे ,सिमेंट बंधारे मातीनाला बांध व अशी अनेक जलयुक्त शिवाराची कामे केली .म्हणूनच राज्यांमध्ये धामणीचा दुसरा क्रमांक आला!
नंतरच्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लक्ष घातले व आज तालुक्यामध्ये विविध उपक्रम करणारी धामणी ची शाळा एक नंबर आहे. सगळ्याच बाबतीत ड्रेस कोड असेल. शनिवार विशेष कार्यक्रम असेल ,डायरी या सगळ्याच बाबतीत जिल्हा परिषद धामणी शाळा एक नंबर राहिली.
सध्या पत्रकार म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख तयार व्हायला लागली आहे !कारण त्यांचं पत्रकार म्हणून निरपेक्ष व निःपक्ष काम वाखाण्याजोग आहे.अशा अंकुश रावांचा माझ्या सहकार्याचा माझ्या मित्राचा आज वाढदिवस !अंकुशराव तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा…..
सदैव तुमचा सहकारी-रवींद्र करंजखेले (पंचायत समिती सदस्य)