ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथिल थोरात कुटुंबाने अभिनव पद्धतीने साजरा केला कन्येचा वाढदिवस!!
ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथिल थोरात कुटुंबाने अभिनव पद्धतीने साजरा केला कन्येचा वाढदिवस!!
ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथिल थोरात कुटुंबाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी(जारकरवाडी) मध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आपल्या ऋतिका गणेश थोरात या कन्येचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला आहे.
वाढदिवसाला होणारा अवास्तव खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी मधील सर्व विद्यार्थी,अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थी, अंगणवाडी ताई,सर्व शिक्षक,स्वयंपाकी, मदतनीस अशा सर्वांना थंडीपासून बचाव करण्यासाठी तब्बल 16 हजार रूपये किमतीच्या जरकिंगचे वाटप केले आहे. या शिवाय ऋतिका पुढील वर्षी पाचवीला जाणार असल्याने त्यांचा कुटुंबाचे वतीने शाळेला व शाळेतील सर्वांना भेटी देण्यात आल्या.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी, शालेय व्यवस्थापन समिती, स्थानिक प्रशासन यांनी कौतुक केले आहे.
शालेय प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक श्री.विजय थोरात, शिक्षिका वैजयंता थोरात, अंगणवाडी सेविका लता लबडे, मदतनीस निर्मला पाचपुते, आत्या गुजाबाई ढोबळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.