हर्बल युनिक राउंडर्स शिरदाळे प्रीमियर लीगचे मानकरी तर ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स ठरले उपविजेते!!
सागदरा सुपर जायंट तृतीय तर शिकोबा टायगर्स चतुर्थ क्रमांकाचे मानकरी!!
हर्बल युनिक राउंडर्स शिरदाळे प्रीमियर लीगचे मानकरी तर ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स ठरले उपविजेते!!
सागदरा सुपर जायंट तृतीय तर शिकोबा टायगर्स चतुर्थ क्रमांकाचे मानकरी!!
काल शिरदाळे येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे व समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांनी आयोजित केलेली एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाली.अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल सात संघांनी सहभाग घेतला होता.
लीग पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.वरील चार विजेते तसेच बुरुंजवाडा सुपर किंग,सप्तशृंगी फायटर्स,वनदेव नाईट रायडर्स आशा एकूण सात संघाचा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात सर्व संघांना संघमालकांद्वारे संघ देऊन त्यांना प्रोफेशनल क्रिकेट किट देण्यात आले होते.
या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ होता हर्बल युनिक राउंडर्स गावठाण या संघाचे संघमालक होते हर्बल ग्रुपचे सर्वेसर्वा श्री.बिपीन चौधरी आणि श्री.स्वप्नील केरभाऊ तांबे(SK),उपविजेता ठरलेला संघ होता ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स या संघाचे मालक होते ऑक्सिनाईल वॉटर फिल्टरचे मालक श्री.योगेश तांबे,तृतीय क्रमांक मिळवलेला संघ होता सागदरा सुपर जायंट या संघाचे संघमालक होते वाघेश्वर डेअरीचे मालक श्री.दत्ता रणपिसे तर समर्थ पेंट्स चे मालक श्री.देविदास रणपिसे,चतुर्थ क्रमांक मिळवला तो शिकोबा टायगर्स या संघाने या संघाचे मालक होते उद्योजक श्री.अशोक काचोळे हे चार संघ बक्षीस पात्र ठरले.
स्पर्धेत असणारे पुढील तीन संघ होते ते सप्तशृंगी फायटर्स या संघाचे संघमालक होते कु.महेश चौधरी व श्री.स्वप्नील तांबे. स्पर्धेमध्ये पुढील संघ होता बुरुंजवाडा सुपर किंग आणि संघाचे संघमालक होते ते श्री.अशोक महादू तांबे स्पर्धेमध्ये शेवटचा संघ होता तो वनदेव नाईट रायडर्स आणि या संघाचे संघमालक होते श्री.विशाल तांबे आणि श्री.गणेश सखाराम तांबे. आशा या सातही संघांना संघमालकांनी स्पॉन्सर केले होते.
तर स्पर्धा म्हटलं की त्या स्पर्धेला बक्षीस असल्याशिवाय स्पर्धा पूर्ण होत नाही. म्हणूनच गावातील तरुण सहकाऱ्यांनी या स्पर्धेला रोख स्वरूपात बक्षीस म्हणून रक्कम दिली होती. त्यामध्ये श्री.विकास रणपिसे,श्री.अमित तांबे,श्री.संतोष ज्ञानेश्वर तांबे,श्री.सुनील रणपिसे,श्री.प्रशांत चौधरी,श्री.सागर तांबे,कु.निखिल तांबे,कु.अक्षय तांबे,श्री.गणेश रामदास तांबे या युवा उद्योजक मंडळींनी रोख स्वरूपात बक्षीस या स्पर्धेसाठी दिले होते. तर एक ते चार क्रमांकाचे चषक सौजन्य श्री. अविनाश तांबे व श्री.सुशांत तांबे यांनी दिले होते.तर स्पर्धेसाठी बॉल सौजन्य श्री.मयुर सरडे यांनी दिले होते. बॅट आणि स्टंप सौजन्य श्री.संदेश तांबे आणि कु.गोपीनाथ तांबे यांनी दिले होते. तर श्री.बाळासाहेब रणपिसे,श्री.बाबाजी चौधरी,श्री.संतोष बजरंग तांबे यांनी ट्रॅक्टर सौजन्य दिले होते.तर श्री.संजय तांबे व कु.शंकर तांबे यांनी पिच बनवण्याचे काम केले होते.तर संपूर्ण स्पर्धेला ऑक्सिनाईल शुद्ध पाणी मोफत देण्याचे काम श्री.योगेश तांबे यांनी केले. आशा सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाली.
खूप दिवसांनी गावामध्ये सर्व तरुणांनी एकत्र येत ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. स्पर्धा म्हणजे हे फक्त निमित्त होते परंतु या माध्यमातून गावातील सर्व लहान,तरुण एकत्र येऊन एकत्र खेळून हितगुज करत असतात. यातून गावचा एकोपा आणि गावचा उत्सव अधिक आनंदीदाई होण्यास मदत होत असते. त्यामुळे पहिल्याच वर्षी स्पर्धा एवढी उत्तम पार पडली आहे की यामुळे स्पर्धेची उंची भविष्यात नक्कीच वाढेल.