प्रसाद महाराज अमळनेरकर दिंडीचे धामणीत उत्साहात स्वागत!!
प्रसाद महाराज अमळनेरकर दिंडीचे धामणीत उत्साहात स्वागत!!
दरवर्षीप्रमाणे यंदाही सखाराम महाराज संस्थान अमळनेर (जि. जळगाव) येथील ह.भ.प.प्रसाद महाराज अंमळनेकर (गोविंदबुवा) यांच्या पायी दिंडीचे रविवारी सकाळी धामणी (ता.आंबेगाव) येथे आगमन झाले.
टाळमृदुंगाच्या गजरात दिंडीचे स्वागत करण्यात आले.पायी दिंडी श्रीक्षेत्र केंदूर येथून पाबळ लोणी मार्गे पुरातन श्री खंडोबा देवस्थान मंदिरात आली. अंमळनेरकर महाराजाच्या हस्ते खंडोबाची आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन पायी दिंडी धामणीच्या पेठेतून वाजतगाजत येथील पुरातन श्री राम मंदिरात विसावली.
यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती.महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.राम मंदिरात महापूजा व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होऊन सांयकाळी चार वाजता अंमळनेरकर दिंडीचे पारगांव (शिंगवे) कडे प्रस्थान झाले.रविवारी व सोमवारी या दिंडीचा मुक्काम पारगाव येथे असल्याचे सांगण्यात आले.
सतराव्या शतकापासून सखाराम महाराज संस्थान अमळनेरकर पायी दिंडी श्रीक्षेत्र आळंदीहून अंमळनेरला जाताना धामणी येथील श्री राम मंदिरात येत असते. धामणी येथील कुलस्वामी म्हाळसाकांत देवस्थान मंदिराच्या “मार्तंड” महाद्बाराच्या दोन्ही बाजूला “जयविजय” चे संगमरवरी शिल्प भिमाशंकर साखर कारखाण्याच्या संचालिका पुष्पलता वामनराव जाधव,प्रा.उत्तमराव जाधव आणि बाळशिराम जाधव गुरुजी यांनी जयपूर (राजस्थान) येथून आणलेले असून त्या शिल्पाचे अनावरण प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदा सोमवारी (२ डिंसेबर) सकाळी नऊ वाजता आयोजित केले असल्याचे देवस्थानचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.