निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ज्यूनिअर कॉलेज मध्ये अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन!!
निरगुडसर येथील विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा!!
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ज्यूनिअर कॉलेज मध्ये अपूर्व विज्ञान मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते.शालेय विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची आवड आणि गोडी निर्माण होण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत होऊन संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी शालेय पातळीवर या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळव्याचे उद्घाटन निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर,माजी प्राचार्या सुनंदा गोरे,जेष्ठ नागरीक शंकर वळसे पाटील,मॅझिक बसचे रविंद्र शेळके,संतोष थिटे सर्व शिक्षक व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यासाठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण १२३ प्रकल्पांची मांडणी व सादरीकरण केले होते.या प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण रस्ते अपघात नियंत्रण प्रयोग ठरला तसेच पवनचक्की,पाणी शुद्धीकरण,ज्वालामुखी उद्रेक,वॉटर अलार्म,बायोगॅस यंत्र, मानवी पचन संस्था इत्यादी प्रयोग सादर करण्यात आले होते. हा अपूर्व विज्ञान मेळवा विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांच्या प्रमूख मार्गदर्शानाखाली पार पडला.
या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे नियोजन विज्ञान शिक्षक पर्यवेक्षक संतोष वळसे, बाळासाहेब येवले, भाऊसाहेब शेंडकर,जयश्री गुंजाळ,मोहन दरेकर व सर्व शिक्षकांनी केले होते.हा अपूर्व मेळवा पाहाण्यासाठी निरगुडसर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता शेटे व त्यांचे सर्व विद्यार्थी,भराडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा वळसे पाटील व त्यांचे सर्व विद्यार्थी, मेंगडेवाडीचे मुख्याध्यापक अनिल उनवणे व मोठ्या संख्येने पालक व माता पालक व ग्रामस्थांनी या अपूर्व विज्ञान प्रदर्शानाचा लाभ घेतला.
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगाची पहाणी करताना उपस्थित मान्यवर