आरोग्य व शिक्षण

P.K. फाऊंडेशन तसेच P.K. टेक्निकल कॅम्पस चाकण आयोजित मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत धामणी (ता. आंबेगाव) येथील कु. ऋतुजा अरूण बोऱ्हाडे ने पटकावला प्रथम क्रमांक!!

P.K. फाऊंडेशन तसेच P.K. टेक्निकल कॅम्पस चाकण आयोजित मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत धामणी (ता. आंबेगाव) येथील कु. ऋतुजा अरूण बोऱ्हाडे ने पटकावला प्रथम क्रमांक!!

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून P.K. फाऊंडेशन तसेच P.K. टेक्निकल कॅम्पस चाकण, पुणे यांच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आलेल्या मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेत धामणी (ता. आंबेगाव) येथील कू. ऋतुजा अरूण बोऱ्हाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या या स्पर्धेत फोटोग्राफिसाठी 5 विषय देण्यात आले होते.ऋतुजाने आर्किटेक्टचर फोटोग्राफी हा विषय निवडून पुण्यातील रामदरा मंदिराचा फोटो स्पर्धेसाठी पाठवला होता.

या स्पर्धेत ऋतुजाने प्रथम क्रमांक पटकवल्याने तिला P.K. फाऊंडेशन तसेच P.K. टेक्निकल कॅम्पस चाकण यांच्या वतीने रोख रक्कम रूपये 3,001/- प्रशस्तीपत्रक, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कु. ऋतुजा अरूण बोऱ्हाडे हिच्या यशाबद्दल धामणी ग्रामस्थांनी तिचे व तिच्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.