धामणी(ता.आंबेगाव)ग्रामस्थांच्या मागणीला आले यश!! पोस्ट ऑफिस धामणी व कृषी विभागाने कॅम्प केला आयोजित!!

धामणी ग्रामस्थांच्या मागणी ला आले यश!! पोस्ट ऑफिस धामणी व कृषी विभागाने कॅम्प केला आयोजित!!
केंद्र सरकारच्या पी.एम.किसान योजने अंतर्गत,शेतकरी बांधवांना वर्षाला ६०००/- रुपये मिळणारे अनुदान हे तांत्रिक कारणाने बंद झाले आहे. त्या संदर्भात काही शेतकरी बांधवाना पोस्टमध्ये खाते उघडण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते.
परंतु धामणी,पहाडदरा, शिरदाळे, खडकवाडी, ज्ञानेश्वरवस्ती येथील शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार, काल धामणी डाकघराचे पोस्टमास्तर श्री. योगेश सांगडे यांना नविन पोस्ट खाते काढण्यासाठी कॅम्प आयोजित करुन सदर शेतकर्यांना गावातच सोय उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले होते.
कृषी विभाग व धामणी पोस्ट ऑफिस यांनी तात्काळ यावर कार्यवाही करुन आज कॅम्प आयोजित केला होता. त्यात तब्बल १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांना फायदा होऊन नविन खाते व केवायसी करुन पी.एम.किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्या प्रसंगी उपसरपंच संतोष करंजखेले,मा. सरपंच सागर जाधव ,खडकवाडी चे मा.उपसरपंच किरण वाळुंज, ग्रा.प.सदस्य अक्षय विधाटे , कृषी अधिकारी अरुण जोरी धामणी पोस्ट ऑफिस चे शाखा व्यवस्थापक योगेश सांगळे , कृषी अधिकारी पवार साहेब , छाया शिंदे , पोस्ट ऑफिसचे अधिकारी अनिल अहिरे व भीष्म मंडले , पोस्टमन सुधाकर जाधव , युवराज बढेकर , नितीन गाढवे , वेंकट जाधव ,कुंडलिक जाधव , दशरथ विधाटे ,आबा रोडे , दगडू भुमकर गावातील ग्रामस्थ,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.