आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स मध्ये बी.बी.ए,बी.सी.ए.या नवीन अभ्यासक्रमांना परवानगी!!

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स मध्ये बी.बी.ए,बी.सी.ए या नवीन अभ्यासक्रमांना परवानगी!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाअंतर्गत बीबीए,बीसीए हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली ने परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.

बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) व बीसीए (बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) प्रवेश क्षमता प्रत्येकी १२० असणारे हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत.सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाणार असून त्यासाठी सीईटी देणे आवश्यक असल्याचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी सांगितले.

सदर अभ्यासक्रम हे तीन वर्षाचे असून बारावी कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह,फायनान्शिअल मॅनेजर,प्रोडक्शन मॅनेजर,बिझनेस प्लॅन डिझाईनर,ब्रांडींग स्पेशालिस्ट,क्वालिटी कंट्रोल मॅनेजर,इन्व्हेस्टमेंट बँकर,ई-कॉमर्स अँड डाटा अनालिटीक्स,ॲडव्हर्टायझिंग,डिजिटल मार्केटिंग,जूनियर प्रोग्रॅमर,सॉफ्टवेअर डेव्हलपर,वेब डिझायनर,सिस्टीम अनालिस्ट,सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अशुरन्स,नेटवर्क इंजिनियर,टेक्निकल रायटर,सॉफ्टवेअर पब्लिशर्स,इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर,डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स,चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.

यापूर्वी समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स या विभागामध्ये बी सी एस,बीबीए (आय बी ) बीकॉम,एम एस्सी (कम्प्युटर सायन्स), एम एस्सी (कम्प्युटर एप्लीकेशन ) आदी प्रकारचे अभ्यासक्रम सुरू आहेत.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सॉफ्ट स्किल व संभाषण कौशल्य बरोबरच जर्मन भाषेचेही प्रशिक्षण दिले जाते.अनेक शैक्षणिक व व्यवसायाभिमुख उपक्रम संकुलामध्ये सातत्याने राबवले जातात.

सदरचे अभ्यासक्रम सुरू झाल्याने बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.
प्रवेशप्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी प्रा.गणेश बोरचटे-८६००७७६३०७,प्रा.प्रशांत काशीद-९८६०३३४५१९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.