आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात प्रकाश सापळे प्रात्यक्षिक!!

हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात प्रकाश सापळे प्रात्यक्षिक!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

हुमणीचा प्रादुर्भाव काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी पारगाव तर्फे खेड येथे एकात्मीक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे कसे गरजेचे आहे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

भुंगेरे व अळी पिकांचे नुकसान करत असतात भुंगेरा झाडाची पाने खातात तर अळ्या पिकांची मुळे खातात.प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस , सोयाबीन व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात. त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीकच वाळते. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्के तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (जून ते ऑगस्ट) करणे महत्त्वाचे आहे. हुमणीची बारा महिन्यात एकच पिढी तयार होते. असे असले तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकांच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता अधिक असल्याने पीक जास्त प्रमाणात नष्ट होते. त्यामुळे हुमणी कीड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगीण उपाय करणे आवश्यक आहे.

हुमणी किडीच्या अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीला सूर्यास्तानंतर खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुनिंबाच्या झाडांवर जमा होणारे भुंगेरे हे होय. किडीना आकर्षित करण्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे गरजेचे आहेत.त्यामुळे रॉकेल मिश्रित पाण्यात भुंगेरे पडून मरण पावतात.
हे नियंत्रण उपायामध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी नियंत्रण सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आंबेगाव मा वेताळ साहेब यांनी केले आहे. मार्गदर्शनाखाली पार पडले.. यांच्या शेतावर करण्यात आले.

वळवाचा पहिला पाउस चांगला झाल्यास सुप्तअवस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ,कडूनिंब, बोर, चिंच, पिंपळ, शेवगा, गुलमोहर अशा 56 वनस्पतीवर जगू शकतात पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामध्ये संध्याकाळी सूर्यास्तानंतर बाहेर पडतात भुंगेरे निशाचर असतात. हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोडा कालावधीसाठी जमिनी बाहेर असते बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत किडींचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.पारगाव त खेड येथे, हुमणी किड नियंत्रण प्रकाश सापळा बीजप्रक्रिया,MREGS लागवड, महा डीबीटी,PMFME कृषि विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमिला मडके पारगाव तर्फ खेड कृषि सहाय्यक

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.