आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

बाळासाहेबांची शिवसेना मंचर शहर आयोजित किल्ले बनवा, रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार, शिवसेना उपनेते, श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न!!

बाळासाहेबांची शिवसेना मंचर शहर आयोजित किल्ले बनवा, रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार, शिवसेना उपनेते, श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न!!

दिपावली निमित्त बाळासाहेबांची शिवसेना मंचर शहर आयोजित किल्ले बनवा आणि रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार, शिवसेना उपनेते, श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संपर्क कार्यालयात संपन्न झाला. सहभागी स्पर्धकांना त्यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, मा. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, महिला आघाडी उपाध्यक्ष मालती थोरात, मा.ग्रा.पं. सदस्य स्वप्नील बेंडे पाटील, सविता क्षीरसागर, रामा भक्ते-थोरात, माऊली लोखंडे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मंचर शहर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे तसेच स्पर्धेचे परीक्षक गणेश कडलग व धनेश राऊत यांचे आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.