आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

समर्थ शैक्षणिक संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,बीसीएस चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,प्रा.संजय कंधारे,एमबीएचे प्राचार्य शिरीष नाना गवळी,डॉ.महेश भास्कर,समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनिल कवडे,समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,विष्णू मापारी,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश पाडेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.संगीत शिक्षक राहुल दूधवडे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.ब्रिटिश राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला.२६ जानेवारी १९५० ला संविधान अर्थात राज्यघटना लागू झाली.देशाप्रति निष्ठा ठेवून आपल्या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे देशसेवा करण्यासारखेच असल्याचे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,ज्ञानेश्वर जाधव,किरण वाघ व सहकाऱ्यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संजय कंधारे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.