आरोग्य व शिक्षण

समर्थ संकुलात स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान!!

समर्थ संकुलात स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान!!

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. संकुलातील शिक्षिका आणि विद्यार्थिनींच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,इंदिरा गांधी,लता मंगेशकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,डॉ.शिरीष गवळी,बी.सी.एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.बसवराज हातपक्की,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा.स्नेहा शेगर,वुमन एमपावरमेन्ट सेल च्या प्रा.रोहिणी रोटे,रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.दिनेश जाधव,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,प्रा.गौरी भोर आदी उपस्थित होते.

प्रवचनकार आणि कीर्तनकार ह.भ.प ऋतुजाताई पवार यांचे विद्यार्थिनींसाठी स्फूर्तीदायी व प्रेरणा देणारे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ह.भ.प.ऋतुजाताई पवार विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,स्त्री म्हणजे माया,ममता,वात्सल्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे.ज्या ठिकाणी नारीचा आदर आणि सन्मान होतो त्या ठिकाणी उत्कर्ष होतो.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.तसेच शिवबाला घडवणारी जिजाऊ,श्याम ला घडवणारी श्यामची आई,झाशीची राणी लक्ष्मीबाई,आंबेडकरांची पत्नी रमाई यांनी राष्ट्रउभारणी साठी त्याग केला त्याप्रति आदरयुक्त भाव ठेवून विद्यार्थिनींनी देखील आपल्या जीवनात उत्कर्ष साधावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

महिलांना भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी भरपूर संधी आहे.सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.

विद्यार्थिनींमध्ये आरती झावरे,प्रीती डुकरे,ऋतुजा मुळे,सोनाली पत्रिकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रा.स्नेहा शेगर,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.संपदा निमसे,प्रा.रोहिणी रोटे,प्रा.प्रियांका दाते यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थिनींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे असे सांगितले.महिला दिनानिमित्त संकुलात विद्यार्थीनींसाठी वाद विवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा इ.स्पर्धांचे आयोजन केले होते.

यावेळी उपस्थित महिला शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रद्धा नलावडे हिने तर आभार महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा प्रा.स्नेहा शेगर यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.