आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे नागपंचमीच्या निमित्ताने रंगला कलगीतुऱ्याचा सामना!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे नागपंचमीच्या निमित्ताने रंगला कलगीतुऱ्याचा सामना!!

आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे नागपंचमीच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

नागपंचमी सणाच्या निमित्ताने दरवर्षी लोणी या ठिकाणी कलगीतुराच्या सामन्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्याचे हे 29 वे वर्ष आहे. कलगीतुऱ्याचा हा सामना पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन समोरील बाजार तर गर्दीने फुलून गेला होता. शाहीर रामदास गुंड आणि मंडळ तुरेवाले (ता.पारनेर) विरुद्ध शाहीर नानासाहेब साळुंखे आणि मंडळी कलगीवाले (ता.श्रीगोंदा) यांच्यात जोरदार कलगीतुरा सामना रंगला. ढोलकी,टाळ, संबळ व तुंतूण्याच्या तालावर रंगलेला हा जंगी सामना उपस्थित रसिकांच्या मनात व कानात ज्ञानाची भर टाकून गेला.

डपाची थाप ,ढोलकीचा गगनभेदी आवाज आणि शाहिरांनी पहाडी आवाजात सादर केलेली कवने श्रोत्यांची दाद घेऊन गेली. सर्वधर्मसमभाव,देशभक्ती, मातृ-पितृ भक्ती, धार्मिक पुरानावरील सवाल जवाब उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.

हा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी नगर संगमनेर, नाशिक, लोणी धामणी पंचक्रोशीतील हजारो रसिकांनी गर्दी केली होती. सदर कार्यक्रमाचे नियोजन किसन गायकवाड, पिंटूशेठ पडवळ, प्रकाश वाळुंज, जगन लंके, सावळेराम नाईक, हैबत आढाव,संदीप आढाव, अशोक आदक पाटील,अमित वाळुंज बाळासाहेब गायकवाड, सदाशिव आदक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच उद्धव लंके यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.