आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शेकडो वर्षांची परंपरा जपत शिरदाळे(ता.आंबेगाव)येथे धुलिवंदन सण उत्साहात साजरा!!

शेकडो वर्षांची परंपरा जपत शिरदाळे(ता.आंबेगाव)येथे धुलिवंदन सण उत्साहात साजरा!!

शिरदाळे हे आंबेगाव तालुक्यातील छोटंसं व टुमदार गाव. अभिनव उपक्रमामुळे कायमच हे गाव चर्चेत असते.त्याच अनुषंगाने गावातील सर्व मंडळी प्रत्येक पारंपरिक सणाला,सप्ताहाला एकत्र येत तो सण साजरा करत असतात. त्यातीलच एक धुलिवंदन हा सण गावच्या पारंपरिक वैभवात भर घालणारा सण. या सणाला गावातील लहान मुलं, शाळकरी मुलं तर यावर्षी काही तरुण मंडळींनी यात सहभागी होऊन या सणाला आनंद द्विगुणित केला.

चाफ्याची फुले,हार,साडीने केलेली सजावट ,डोक्यावर फेटा आणि हातात वीर देवाची काठी आणि वीर देव अशी सजावट करून ही मिरवणूक गावच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात आणली जाते. त्या ठिकाणी महिलांनी पाण्याचे हेल घालून तयार गेलेला गोलाकार फेरा धरून सर्व वीर देव नाचतात.त्यांच्या बरोबरीने गावातील जेष्ठ मंडळी घाई धरून सनई आणि ताशाच्या तालावर फेरा धरून नाचत असतात. त्यानंतर ही मिरवणूक महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा चौकात आणली जाते त्याठिकाणी अनेक तरुण ,जेष्ठ मंडळी यात सहभागी होऊन या सणाला आनंद घेत असतात. यावर्षी विद्यमान उपसरपंच श्री.बिपीन चौधरी,गणेश तांबे,बाळासाहेब रणपिसे हे मंडळी वीर देवाच्या वेशात येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर इतिहास प्रेमी सुशांत तांबे आणि सिद्धेश रणपिसे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण आणि फोटो शूट केले.

यावेळी अनेक ग्रामस्थांनी वाजंत्री मंडळींना ओवाळणी स्वरूपात रक्कम दिली.कुठल्याही धार्मिक,सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उत्सव साजरा करत असतो. यावर्षी देखील ही संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वांच्या सहभागाने कुठलाही कार्यक्रम अधिक चांगला होत असतो. शेकडो वर्षांची परंपरा असलेला आमचा हा कार्यक्रम आम्ही अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते असे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.