आरोग्य व शिक्षण

समाजामध्ये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवायचा असेल तर कला, क्रीडा, तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात नैपुण्य मिळविणे आवश्यक- श्री.अक्षय आढळराव पाटील

समाजामध्ये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवायचा असेल तर कला, क्रीडा, तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात नैपुण्य मिळविणे आवश्यक- श्री.अक्षय आढळराव पाटील

श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी संचलित शिवमल्हार २०२३ या सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री केतकी माटेगावकर, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.कल्पनाताई आढळराव पाटील, संस्थेचे सचिव अक्षय आढळराव पाटील, संचालक अपूर्व आढळराव पाटील, सौ.नताली आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना अक्षय आढळराव पाटील म्हणाले की, हल्लीची मुलांची पिढी अतिशय प्रगत असून विद्यार्थी अभ्यासामध्ये अतिशय चांगले गुण मिळून उत्तीर्ण होताना दिसत आहेत. परंतु समाजामध्ये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवायचा असेल तर कला, क्रीडा, तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात नैपुण्य मिळविणे आवश्यक आहे.

बदलत्या स्पर्धेच्या युगात मुलांमध्ये आत्मविश्वास किती आहे, स्टेज प्रेझेंस किती आहे याला जास्त महत्त्व आहे. स्टेज प्रेझेंस म्हणजे केवळ कला दाखविण्यापूरते मर्यादित नसून एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण नोकरी मागण्यासाठी जातो तेव्हा आपण त्या कंपनीची ध्येय धोरणे बाजारपेठेत सक्षमपणे व आत्मविश्वासाने मांडू शकतो का हे पाहिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत विकास व्हावा या भावनेतून या संस्थेचे चेअरमन तुम्हा आम्हा सर्वांचे ‘दादा’ दरवर्षी काही ना काही नवीन अभिनव प्रकल्प येथे राबवतात. त्यातूनच यंदाच्या वर्षी उच्च दर्जाच्या प्रेक्षागृहाची निर्मिती येथे करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.

अभिनेत्री केतकी माटेगावकर म्हणाल्या की, मी कलाकार असले तरी माझ्या आईने वेळोवेळी मला शिक्षण क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. माझ्या कुटुंबातले अनेकजण उच्चशिक्षित आहेत. उत्तम वातावरण व सर्व सुखसोयींनी युक्त असलेले शैक्षणिक संकुल अतिशय मोजकेच असून मी आवर्जून त्यात प्राधान्याने या शिक्षण संस्थेचा उल्लेख करेन. मी साकारलेल्या ‘तानी’ सारख्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे सिनेमे यापुढेही करायला मला खूप आवडेल असे प्रतिपादन करत आपल्या बहारदार शैलीत “मला वेड लागले रे…” हे सुंदरसे गाणे रसिक स्त्रोत्यांसाठी सादर केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्यकला सादर करून या सांस्कृतिक महोत्सवात रंग भरले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.