आरोग्य व शिक्षण

आणि… खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे दोन पिढ्यांचा सुरू असलेला रस्त्याचा वाद अखेर मिटला!!

खडकवाडी तंटामुक्ती समितीच्या मध्यस्थिला आले यश!!

आणि… खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे दोन पिढ्यांचा सुरू असलेला रस्त्याचा वाद अखेर मिटला!!

खडकवाडी तंटामुक्ती समितीच्या मध्यस्थिला आले यश!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वार्थाने प्रगतशील गावं म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी गावातली दोन पिढ्यांचा सुरू असलेला रस्त्याचा वाद मिटविण्यात खडकवाडी तंटामुक्ती समितीला यश आल्याची माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. एकनाथ सुक्रे यांनी पंचनामा शी बोलताना दिली.

येथील शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक शेत रस्ते, वहिवाट रस्त्यांसंबंधी तसेच शेतमाल वाहतुकीसाठी व वस्तीसाठी रस्ता बंद होता.ज्यामुळे सर्व शेतकऱ्याना अडचणीला सामोरे जावे लागत होते. सर्व स्थानिक शेतकऱ्यांच्या संगतमताने हा रस्ता खुला करण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. शिवाय होणारी गैरसोय ही टळणार आहे.

या ठिकाणी लोकवस्ती असल्याने नागरिकांना जाणे- येणे बंद झाले होते. शेतकऱ्यांना शेतीमाल डोक्यावर बाहेर काढावा लागत असे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. या रस्त्यासाठी अनेक वादविवाद होते.या रस्त्यावरून कायम होणारा वाद व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सुक्रे, चेअरमन नाथा सुक्रे,संतोष सुक्रे, यांनी मध्यस्थी करून शेतकरी संतोष डोके, सखाराम वाळुंज, तुकाराम वाळुंज, बाळू वाळुंज, भिवसेन सुक्रे, चंद्रकांत वाळुंज, नारायण वाळुंज, रामदास सुक्रे, जयराम वाळुंज, सुरेश वाळुंज,या वस्तीवरील सर्व भाऊबंदांना एकत्र घेऊन,विश्वासात घेऊन ह्या रस्त्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यात आला आहे अशी माहिती मा.सरपंच अनिल डोके यांनी दिली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.