आरोग्य व शिक्षण

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे पारंपरिक पद्धतीने होळी,धुलवड साजरी!!

शिरदाळे येथे पारंपरिक पद्धतीने होळी,धुलवड साजरी!!

शिरदाळे हे ग्रामीण भागातील संस्कृती टिकवून ठेवणारे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रचलित आहे. गावात प्रत्येक धार्मिक सण, सामूहिक कार्यक्रम ,लग्न समारंभ असे कार्यक्रम एकत्र येऊन केले जातात. एकत्र असणारी लोकवस्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेलं हे खेडं नक्कीच आजच्या युगात एक आदर्श गाव म्हणावं लागेल.
सालाबादप्रमाणे यंदा ही या ठिकाणी धुलवड हा सण अतिशय आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात ह.भ.प.संतोश महाराज बढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असणारी माऊली मंदिर बढेकर मळा ते श्री.क्षेत्र देहू पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले आणि श्री.किसन धोंडिबा तांबे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दिंडीला अल्पोपहार देण्यात आला. यावेळी हनुमान भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी ४ वा.वीर देवांच्या मिरवणुका निघाल्या. पारंपारिक वाद्यांच्या व सनईच्या सुरात वीर देवांना गावच्या हनुमान चौकात आणण्यात आले. पारंपरिक वेशभूषा केलेल्या मुलांना देवाचा दर्जा देऊन त्यांना सजवले जाते. गावातून मिरवणूक काढून जेष्ठ मंडळी जुन्या पद्धतीने घाई धरून आपल्या खेळाची प्रात्यक्षिके दाखवतात. यानंतर वीर देवांना घरी नेऊन गावातील सुवासिनी त्यांना ओवाळून त्यांचे पाय धुतात अशी शेकडो वर्षाची परंपरा या गावात आजही जपली जाते.
या कार्यक्रमाला गावातील सर्व जेष्ठ मंडळी,सर्व महिला,लहान मुले मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात. यावेळी उपसरपंच श्री.मयुर सरडे,ग्रा.पं. सदस्य बिपीन चौधरी,कोंडीभाऊ तांबे,जयदीप चौधरी ,विशाल रणपिसे,सखाराम तांबे,रंगनाथ रणपिसे आणि गावातील अनेक बुजुर्ग मंडळी उपस्थित होती.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.