आरोग्य व शिक्षण

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांना हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्कार प्रदान!!

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांना हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्कार प्रदान!!

कोल्हापूर, गोवा: प्रतिनिधी

गोवा येथे झालेल्या शिवजयंती महोत्सव मध्ये ज्येष्ठ जागतिक शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र मंडळ, गोवा यांच्या वतीने देशभरामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

लोककल्याणार्थ कार्य करण्यासाठी नेहमीच धडपड करणारे महाराष्ट्राच्या कोल्हापुरातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जगन्नाथ पाटील. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेल्या मानपत्रात नमूद केले आहे की ‘ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी शैक्षणिक प्रसारक व संशोधक अशा प्रवासामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील जागतिक शिखरे पादक्रांत करून माय मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवण्याचे कार्य केले आहे. अनेक देशांमध्ये उच्च शिक्षण गुणवत्तेच्या धोरणासंदर्भात, मानवी कल्याणासाठी व मानवी जीवन उंचावण्यासाठी डॉ. पाटील यांचे हे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. या कार्यासाठी महाराष्ट्र मंडळ गोवा यांच्या यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्काराने डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्याबरोबरच वैद्यकीय ,आर्थिक विदेश, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या चार अन्य मान्यवरांना देखील गौरवण्यात आले आहे.

मुलुखगिरी करणे हा मराठ्यांचा इतिहास आणि वैभवशाली परंपरा आहे. आजही अनेक मराठी माणसं देशभरात आणि जगभरात आपल्या कर्तुत्वाने मराठी माणसाचं नाव उंचावत आहेत. आणि या सर्वांना जोडणारा समान धागा म्हणजे शिवछत्रपतींचा इतिहास आणि उत्सव आहे असे प्रतिपादन डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना केलं.
पुरस्कार वितरणासाठी गोव्याचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार अनिल पाटील, औषधतज्ञ डॉ. राजेश परब, श्रीमंत इंदुलकर घराण्याचे प्रतिनिधी, महाराष्ट्र मंडळ गोवा चे सर्व पदाधिकारी आदी मंडळी उपस्थित होती. छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, शिवज्योती मिरवणूक ,विविध सांस्कृतिक उपक्रम अशा भरगच्च कार्यक्रमांद्वारे गोव्याच्या महाराष्ट्र मंडळाने शेकडो मराठी भाषिकांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.