आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नांदगाव येथे कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

नांदगाव येथे कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

प्रतिनिधी -समीर गोरडे

मौजे नांदगाव येथे डाॕ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषिदुतंमार्फत गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . ग्रामदैवत रोकडेश्वर महाराजांची पूजा करून कार्यक्रमास शुभारंभ झाला त्याचबरोबर कृषी दुतांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी नवीन मोबाईल एप्लिकेशन्स krishak , farm.s.s-mart या अग्रिकल्चर e-apps चा वापर शेती आणि व्यापार यासाठी कसा होईल याची माहिती दिली व महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या अंतर्गत चालू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाची उद्दिष्टे सांगितली.
शेतकऱ्यांनी गावातील मुख्य पीक कांदा ऊस य या पिकांवरील कीड व रोग यांची माहिती दिली व त्या पीकांवरील रोग निंयत्रणासाठी कृषी दूतांनी एकात्मिक किड व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयातील कृषिदुत स्वरूप काळे, सूरज थोरात,ओम ठाकूर,निरंजन सावंत,गौरव जमदाडे,सार्थक थोरवे व युवराज भोर यांनी बदलत्या हवामानामुळे पिकांना व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचनीनवर मात करण्यासाठी शेतकर्यांप्रमाने आम्हीही कटिबद्ध आहोत हा विश्वास पटवून दिला व गावातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला.शेतकऱ्यांना या कार्यक्रमातून समाधानकारक माहिती मिळाली .
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषिदुतांना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी.गायकवाड, व प्रा.एस.व्ही.बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.