आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संगमवाडीत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक होणार

शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती

संगमवाडीत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक होणार

शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संगमवाडी, जि.पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम व इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करणेकरीता गठीत करण्यात आलेल्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीची आढावा बैठक पुणे महापालिका आयुक्त विक्रमसिंह यांचे दालनात संपन्न झाली.

संगमवाडी, पुणे येथे होणाऱ्या या स्मारकाचे सुमारे १०० कोटीचे अंदाजपत्रक बनविण्यात आले असून त्यात काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात यावा अशा आशयाच्या सूचना यावेळी शिवसेना उपनेते,मा. खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठकीत केल्या.

या बैठकीस आढळराव पाटील यांच्या समवेत समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, सदस्य प्रा.काशिनाथ आल्हाट,भास्करराव नेटके, रामदास साळवे, निलेश वाघमारे, प्रकाश वैराळ, सुनील खंडाळे, संतोष लांडगे यासह शासन समितीतील सर्व मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.