आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धामणी(ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले महाआरोग्य शिबिर!!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धामणी(ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले महाआरोग्य शिबिर!!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात महाआरोग्य शिबिर व जागरुक पालक सुदृढ बालक हे अभियान मोठ्या उत्साहात पार पडण्यात आले. धामणी गावच्या सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे यांच्या हस्ते फित कापुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे यांनी बोलताना सांगितले की या शिबिराचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे. शिबिरातील रुग्णांची पुढील उपचारासाठी आरोग्य विभागाने जबाबदारी घ्यावी.

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये गरोदर माता तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, कॅन्सर तपासणी, महिलांसाठी गर्भाशय, मुखाचा कॅन्सर तपासणी व ० ते १८ वर्षापर्यंतची बालके व किशोरवयीन मुलामुलींंचे सर्वांगिण आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात आले आहे. श्री. शिवाजी विद्यालय व ज्युनि कॉलेज च्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींची तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व रुग्णांना पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांच्या वतीने खाऊवाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी डॉ. जयेश बिरारी, उपसरपंच संतोष करंजखेले, मा. सरपंच अंकुश भूमकर, मा. सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, डॉ. उमेश सहाणे, डॉ. सुजाता पडवळ,डॉ. धनंजय लटपटे, डॉ. लता गारुडी, डॉ. शुभम रोडे, डॉ. शेषराव मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, प्रतिक जाधव, जयश्री विधाटे,अक्षय रोडे, अमोल जाधव , रोहित भुमकर , प्रसाद विधाटे , अंकुश बढेकर ,आंग्रे सर, पंकज वायंदेशकर,आरोग्य सहाय्यक भगवानसिंह परदेशी,आरोग्य कर्मचारी, आशा कामगार व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.