आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने बळीराजा चिंतातुर!! बराखीत साठवलेला कांदा सडला!!

वैदवाडी फाटा (जारकरवाडी) येथील शेतकरी बबन केदारी यांनी अर्धलीने शेती करुन कांदा पिक घेतले होते.परंतु सर्व कांदा सडल्याने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने बळीराजा चिंतातुर!! बराखीत साठवलेला कांदा सडला!!

कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.त्यातच बराकीत साठवलेला कांदा हा काढणीवेळी गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात झोडपला होता.तो कांदा सध्या सडला आहे.परिणामी शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर मूल्य वाढवल्याने कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला असून बाजारपेठेतील कांद्याच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आहेत.त्यातच यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला आहे.उत्पन्नात झालेली घट, साठवलेला कांदाही मोठ्या प्रमाणावर सडला आहे. त्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही निघणार नाही.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सध्या कांद्याला पंधरा ते सतरा रुपये प्रति किलो बाजार भाव मिळत आहे.परंतु या बाजारभावात शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही निघत नाही.कांद्याचे बाजारभाव वाढून 20 ते 25 रुपये झाले होते परंतु शासनाने कांद्याचे निर्यातीवरील कर वाढवला आणि कांद्याचे निर्यात घटली परिणामी देशातील कांद्याचे बाजारभाव पडले.

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून कांद्याचे उत्पादन घेतले होते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस त्याचप्रमाणे कांदा काढनीवेळी अनेक ठिकाणी गारपीट झाली होती. त्यामुळे कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. शेतकऱ्यांनी हा कांदा काढून साठवला होता. बराखरीत कांदा मोठ्या प्रमाणावर सढत असल्याने शेतकऱ्यांना भांडवली खर्चही निघणे अवघड झाले आहे.

 

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.