आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार!!

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार!!

शालेय वयात मुलांना व्यवहार ज्ञान समजुन घेता यावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे आठवडे बाजार आयोजीत करण्यात आला होता अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष लबडे सर यांनी पंचनामा शी बोलताना दिली.

दैनंदिन जीवनात विद्यार्थी शालेय शिक्षणात अभ्यास करत असतात. मात्र प्रत्यक्षपने बाहेरच्या जगात वावरत असताना त्यांना व्यवहार ज्ञान होणे गरजेचे असते. कोणताही व्यवहार करत असताना किती पैसे घेतले किती परत केले यामुळे त्यांचे गणित सुधारते. शिवाय एखादी वस्तू विकण्याची अथवा विकत घेण्याची त्यांची मानसिकता तयार होते. हिच प्राथमिकता लक्षात घेऊन असे उपक्रम राबवले जात असल्याचे सहशिक्षक श्री.हिंगे सर यांनी पंचनामा शी बोलताना सांगितले.

या बाजारात चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या भाज्या, किराणा दुकानात मिळणारे विविध वस्तू,ओली भेळ, वडापाव,चहा, इडली डोसा आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.

या वेळी शालेय व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष श्री.बजरंग देवडे, काळुरम लोखंडे, सूर्यकांत बाँबे, साईनाथ गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.