शिवजयंती चे औचित्य साधून पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश गाडे यांचे सामाजिक कार्य!!

शिवजयंती चे औचित्य साधून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गाडे यांचे सामाजिक कार्य!!
डॉ.सुरेश राठोड(कोल्हापूर)
शिवजयंती निमित्त महाराष्ट्र बरोबर संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे काही लोक आपापल्या पद्धतीने अनेक प्रकारे सामाजिक कार्य करत असतात. पण आज राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी दिलेली शिकवण सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन हे डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती व राज्य राखीव पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद व समादेशक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली, इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित अंकुर मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये अन्नदान करून सामाजिक कार्य केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक अजय लीपारे, प्रमुख पाहुणे प्राचार्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, कार्यकारी संपादक डॉ सुरेश राठोड, परिते सरपंच विजय पाटील, आशुतोष पाटील, सुरेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय बर्गे, शरद डोंगरे व गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक लीपारे म्हणाले, मूळचे पुरंदर गावचे रहिवासी असणारे प्रकाश गाडे हे पोलीस खात्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्य करत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना जावे लागते, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी गेले त्या त्या ठिकाणी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उठवला आहे. असेच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे अवचित्य साधून घोटवडे गावामध्ये असणारी अंकुर गतिमंद मुलांच्या शाळेमध्ये व पुरंदर ते मुरुड जंजिरा येथेही त्यांनी अन्नदान केले आहे. या आधीही त्यांनी अनेक महिलांना रक्षाबंधन निमित्त साडी वाटप, अनेक गोरगरिबांना कपडे व चादर वाटपाचे कार्य केले आहे. हे त्यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.
यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस बँड कडून अनेक सांस्कृतिक वाद्य वाजवत मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला, उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापिका दिपाली पाटील, कार्यशाळा अध्यापिका वसुधा कुलकर्णी यांनी केले.
यावेळी समाधान पाटील, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक गायकवाड, राजशेखर कांबळे, दिनकर पाटील, सदाशिव यादव, सर्व पोलीस कर्मचारी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.