आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल उत्साहात संपन्न!!

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल उत्साहात संपन्न!!

ठाणे- शहापूर येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आदिवासी विकास विभागाच्या मुख्याध्यापकांचे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन दि १३ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजीत करण्यात आले असून यात दि. १३ जानेवारी शनिवार रोजी संकुलाच्या हॉल मध्ये प्रथम दिनी उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार दौलत दरोडा ( अध्यक्ष अनुसूचित जाती ,जमाती समिती महाराष्ट्र राज्य) , आमदार निरंजन डावखरे (कोकण पदवीधर मतदार संघ), आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण शिक्षक मतदार संघ), आदर्श ग्राम समिती सदस्य महा. राज्य भास्करराव पेरे पाटील, अधिवेशन आयोजक मा. वामनराव वांगणे साहेब, विभागीय अध्यक्ष मा. गणेश गावडे साहेब, मा. श्री सोनवणे साहेब , शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे साहेब आदी मान्यवराच्या हस्ते अधिवेशनाच्या प्रथम दिवसाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, अभियांत्रिकी प्राचार्य डॉ.डी.डी शिंदे, तसेच प्राचार्यआशिष काटे, स्टेट बोर्ड प्राचार्य पंकज बडगुजर आदी तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे विश्वस्त अंनत गायकवाड, प्रवीण मोरे आदीनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले.

यावेळी मान्यवरांनी अधिवेशनाचे प्रमुख उद्देश दोन दिवशीय अधिवेशनात आश्रमशाळेतील शिक्षण व्यवस्थापनात मुख्याध्यापकाची भूमिका, आश्रमशाळा गुणवत्तावाढ व सर्वांगीण विकास कार्यक्रम, मुख्याध्यापक शालेय प्रशासन व व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादात अधिवेशनात आश्रमशाळा विकास या विषयावर दोन दिवस मंथन होणार आहे.

सर्वच अतिथी मान्यवरांनी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे भरभरून कौतुक केले ,कार्याची स्तुती करत एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरव उद्गार काढले आणि संस्थेचे शैक्षणिक योगदानाबद्दल कौतुक देखील केले तसेच शैक्षणिक विकासाबरोबर आध्यात्मिक विकासाचे कार्य संस्था करीत आहे याचा आदर्श सर्व संस्थांनी घ्यावा. असे गौरव उद्गार प्रमुख अतिथी केले.

या सर्वच राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनाला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष श्री भगवानराव दौंड साहेब ,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे तसेच समस्त विश्वस्त मंडळाने शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.