आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

साने गुरुजी शिक्षक रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!!

साने गुरुजी शिक्षक रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!!

प्रतिनिधी – शिंगवे पारगाव(समीर गोरडे)
अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने कळंब येथे स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्ताने साने गुरुजी शिक्षक रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव कराळे यांनी भुषविले , कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माधव वझे राष्ट्रीय स्वर्णपदक प्राप्त शामची आई चिञपटातील कलाकार श्याम हे देखील उपस्थित होते,तसेच विनोद शिरसाठ संपादक साप्ताहिक साधना पुणे तसेच अनेक शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कानडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल पाटील व वैशाली गाढवे मॅडम यांनी केले.

स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांच्या शतकोत्तर जयंतीच्या औचित्याने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने सानेगुरुजी शिक्षकरत्न गुणगौरव समारंभ’ एकलहरे (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. २४) सकाळी साडे दहा वाजता रविकिरण हॉटेलच्या सभागृहात पार पडला.

या १२५ व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या शिक्षकरत्न गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे मुंबई राज्याध्यक्ष शामराव कराळे, तर राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त ‘श्यामची आई’ चित्रपटातील बालकलाकार ‘श्याम’ची भूमिका करणारे प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा. माधव वझे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून विनोद शिरसाट ‘मातृहृदयी राष्ट्रप्रेमी सानेगुरुजी’ या विषयी मार्गदर्शन केले. बालसाहित्यिक रमेश तांबे, कान्होबा सार्वजनिक वाचनालय संस्थापक ग्रंथमित्र प्रा. एल. एन. थोरात,अनिता शिंदे गटशिक्षणाधिकारी जुन्नर, कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडे, कोषाध्यक्ष संतोष गडगे, विजय गावडे सरपंच आदर्शगाव गावडेवाडी, संजय डुबंरे, अशोक डोंगरे उपस्थित होते. ‘साने गुरुजी शिक्षकरत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सुनीता राजू वामन (जुन्नर), दीपाली जालिंदर अजाब (आंबेगाव), मधुकर रावजी गिलबिले (खेड), सुषमा राजेंद्र शितोळे (शिरूर), उद्धव जालंदर डेरे (पुणे), पांडुरंग भाऊ पवार (पारनेर), रमाकांत भालचंद्र कवडे (जुन्नर), मच्छिंद्रनाथ रामचंद्र झांजरे(आंबेगाव), संदीप ज्ञानेश्वर म्हसूडगे (खेड), सुरेश शिंदे (शिरूर), सारिका वंजारी (मुळशी), मनोजकुमार बोरा (दौंड) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक प्राप्त शाळांचाही विशेष सन्मान सानेगुरुजी विशेष गौरवार्थी शाळा म्हणून गावडेवाडी (आंबेगाव), जालिंदरनगर (खेड), ठिकेकरवाडी (जुन्नर), एकलहरे (आंबेगाव) या शाळांचा, तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सन्मान करण्यात आला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.